अँटिग्वामध्ये झालेल्या महिला टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आॅस्ट्रेलियाने इंग्लंडला 8 विकेट्सने पराभूत करत चौथ्यांदा टी20 विश्वचषकावर आपले नाव कोरले.
या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या एलिसा हेलीने 56.25च्या सरासरीने सर्वाधिक 225 धावा करत प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार पटकावला. तसेच हेलीने या स्पर्धेत दोन अर्धशतके करताना चार वेळा प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला होता.
यामुळे हेली आणि तिचा पती मिशेल स्टार्क हे दोघे क्रिकेट विश्वचषकाचा सर्वोत्कृष्ठ पुरस्कार मिळवणारी पहिलीच जोडी ठरली आहे. त्या दोघांनी 2015ला लग्न केले.
ऑस्ट्रेलियाच्या पुरूष संघाकडून खेळणाऱ्या मिशेलने 2015च्या 50 षटकांच्या विश्वचषकात सर्वाधिक 22 विकेट घेत प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार मिळवला होता.
तसेच दक्षिण आफ्रिकेची डेन वॅन निकर्क आणि मॅरिझन कॅप ह्या आयसीसीच्या स्पर्धेत एकत्र फलंदाजी करणारी लग्न झालेली पहिली जोडी ठरली होती. त्यांनी श्रीलंकेविरुद्ध 67 धावांची भागीदारी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या:
–प्रो कबड्डीचा पोस्टर बाॅय राहुल चौधरीसाठी आजचा दिवस खास, सुवर्णक्षरांनी लिहीले जाणार नाव
–सिक्युरीटी गार्डने पकडला कोहलीचा अफलातून षटकार, पहा व्हिडीओ
–१८ वर्षीय नवीन कुमारचा प्रो कबड्डीत विक्रमांचा विक्रम