महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने गांवदेवी क्रीडा व युवक मंडळ, भातसाई आयोजित राज्यस्तरीय व्यावसायिक कबड्डी स्पर्धेचा आयोजन करण्यात आले आहे. गांवदेवी क्रीडा व युवक मंडळाची ही सुवर्ण महोस्तवी कबड्डी स्पर्धा असून कै. शांताराम मा. कोतवाल क्रीडा नगरीत दिनांक ७ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी या कालावधी मध्ये यास्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या राज्यस्तरीय व्यावसायिक कबड्डी स्पर्धेत एकूण १६ संघ संघभागी होणार असुन त्याचे ४ गटात विभाजन करून सुरुवातीला साखळी पध्दतीने सामने खेळवण्यात येतील. त्यानंतर बादफेरीचे सामने होतील. युनियन बँक, सेंट्रल बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, भारत पेट्रोलियम, एयर इंडिया, सेंट्रल रेल्वे, मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र पोलीस, ठाणे पोलीस, मुंबई पोर्ट ट्रस्ट, बालाजी प्रतिष्ठान पुणे, रिझर्व बँक, रायगड पोलीस, विनोद कन्स्ट्रक्शन रोहा, डॉकयार्ड नेव्ही उरण व जे. एस. डब्लू. अलीबाग हे संघ स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
या स्पर्धेसाठी आकर्षक रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. अंतिम विजयी संघास रोख रक्कम १,११,१११ रुपये व चषक, अंतिम उपविजयी संघास रोख रक्कम ७७,७७७ रुपये आणि चषक व उपांत्य उपविजयी संघास ५५,५५५ रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तेसच स्पर्धेतील सर्वांत्कृष्ट खेळाडूस १०,००० रुपये व चषक, स्पर्धेतील सर्वांत्कृष्ट चढाईपटू व पकडपटूस प्रत्येकी ५,००० रुपये व चषक असे बक्षीस असणार आहे. त्याच बरोबर प्रत्येक दिवसातील सर्वांत्कृष्ट खेळाडूस २,५०० रुपये व चषक, उत्कृष्ट चढाईपटू व बहारदार पकडीस प्रत्येकी १,००० रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-