सध्या क्रिकेट खूपच बदलले आहे. सुरुवाती फक्त कसोटी क्रिकेट खेळले जायचे. मात्र, सध्या टी20 आणि टी10 हा क्रिकेटप्रकारही मोठ्या प्रमाणात खेळला जात असल्याचे दिसते. मात्र, खेळाडूंची खरी मेहनत आणि त्यांचा कस हा कसोटी क्रिकेट प्रकारातच लागतो. कसोटी क्रिकेट हा खूप जुना क्रिकेट प्रकार आहे. कसोटी क्रिकेटची सुरुवात जवळपास 146 वर्षांपूर्वी झाली होती. मेलबर्न येथे मार्च 1877 मध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात मेलबर्न येथे ऐतिहासिक सामना खेळला गेला होता. कसोटी क्रिकेटच्या सुरुवातीच्या 12 वर्षांपर्यंत या दोन संघांमध्येच आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळले जायचे. यानंतर हळूहळू इतर संघही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू लागले.
कसोटी खेळणारा भारत सहावा देश
सन 1889मध्ये दक्षिण आफ्रिका संघ या यादीत सामील झाला होता. दक्षिण आफ्रिका संघानेही कसोटी पदार्पण इंग्लंड संघाविरुद्धच केले होते. यानंतर 39 वर्षांनंतर 1928मध्ये वेस्ट इंडिज संघाला आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळण्याचा दर्जा मिळाला होता. त्यानंतर दोन वर्षांनी 1930मध्ये न्यूझीलंड संघ देखील या यादीत सामील झाला. भारतीय संघाला आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळण्याची संधी जून 1932मध्ये मिळाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळण्याचा दर्जा मिळवणारा भारतीय संघ सहावा देश होता.
#OnThisDay in 1877, the first ever Test began. Australia's Charles Bannerman faced the 1st ball from England's Alfred Shaw at the @MCG. pic.twitter.com/oSgprlhNvI
— ICC (@ICC) March 15, 2017
हा तो काळ होता, जेव्हा क्रिकेट फक्त कसोटी प्रकारात खेळले जायचे. सर्व देशांनी क्रिकेटचा जनक म्हणल्या जाणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातून कसोटी पदार्पण केले होते. 1877मध्ये सुरू झालेल्या क्रिकेटच्या या प्रवासात 1932पर्यंत म्हणजेच 55 वर्षांपर्यंत एकूण 6 देशांना कसोटी क्रिकेट खेळण्याचा दर्जा मिळाला होता. त्यानंतर पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश यांसारखे संघही सामील झाले.
भारताने कसोटी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली तेव्हा…
भारतीय संघाने जेव्हा पहिला सामना खेळला होता, तेव्हापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर एकूण 218 कसोटी सामने खेळले गेले होते. यामधील सर्वाधिक 192 सामने इंग्लंडने खेळले होते. ऑस्ट्रेलियानेही 148 सामने खेळले होते. या 55 वर्षांच्या काळात दक्षिण आफ्रिका संघाने 75, वेस्ट इंडिज संघ 12 आणि न्यूझीलंड संघाने 9 कसोटी सामने खेळले होते. त्या काळात इंग्लंड संघ सर्वात मजबूत संघ होता.
इतर तीन संघांनी केव्हा केले कसोटी पदार्पण?
पाकिस्तानने ऑक्टोबर 1952मध्ये भारताविरुद्धच्या सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यानंतर 30 वर्षांनी श्रीलंका संघाने इंग्लंड संघाविरुद्ध फेब्रुवारी 1982मध्ये आपला पहिला कसोटी सामना खेळला. तसेच, बांगलादेशला नोव्हेंबर, 2000मध्ये पहिला कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली. मात्र, यापूर्वी बांगलादेश संघाने वनडे पदार्पण केले होते.
असे असले, तरीही सध्याच्या घडीला जागतिक क्रिकेटमध्ये बलाढ्य संघ म्हणून भारतीय संघाचीही गणना केली जाते. (stats and records of test cricket history indian team debut in international cricket)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कशी नशिबानं थट्टा आज मांडली! अनबॉक्सिंग करण्यापूर्वीच गमावला विराटचा नवा कोरा फोन, चाहत्यांकडे मागितली मदत
राहुलने पहिल्या कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनची माहिती केली लीक! ताबडतोब घ्या जाणून






