आयपीएलच्या 16व्या हंगामातील पहिला सामना गुजरात टायटन्सने जिंकला. पहिल्या सामन्यात गुजरातने एमएस धोनी याच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्जला 5 विकेट्स राखून मात दिली. चेन्नईने या सामन्यात पराभव स्वीकारला असला, तरी धोनीला वर्षभरानंतर क्रिकेटच्या मैदानावर पाहून चाहत्यांना आनंद झाला होता. त्याचवेळी दुसऱ्या डावात धोनीला काही वेदना होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याला दुखापत झाली आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला. मात्र, संघाचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी अपडेट दिली आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना धोनीने 7 चेंडूवर नाबाद 14 धावा केल्या. यामध्ये 1 चौकार व एका षटकाराचा समावेश होता. त्यानंतर यष्टीरक्षक करताना 19 व्या षटकात चेंडू अडवताना त्याच्या गुडघ्याला वेदना झाल्याचे स्पष्टपणे दिसून आले. यावर प्रतिक्रिया देताना प्रशिक्षक फ्लेमिंग म्हणाले,
“त्याच्या गुडघ्याची काही समस्या नाही. हे केवळ क्रॅम्प होते. वयाच्या या टप्प्यावर त्याला देखील आपल्या मर्यादा माहित आहेत. त्याच्यासारखा खेळाडू आपल्याला नेहमी मैदानावर लागतो.”
चेन्नईला आपला दुसरा सामना 3 एप्रिल रोजी लखनऊ सुपरजायंट्स विरुद्ध चेन्नई येथे आपल्या घरच्या मैदानावर खेळायचा आहे.
शुक्रवारी (31 मार्च) पार पडलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून गुजरात जायंट्सने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर 20 षटकात सीएसकेने 7 बाद 178 धावा केल्या. सलामीवीर ऋतुराज गायकवाड याने अवघ्या 50 चेंडूत 4 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने 92 धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात गुजरात फलंदाजीला आल्यानंतर सलामीवीर शुबमन गिल याने 36 चेंडूत 63 धावांची खेळी केली. तर, सीएसकेसाठी राजवर्धन हंगरगेकर याने सर्वाधिक तीन बळी मिळवले. अखेरीस गुजरातने 5 गडी राखून विजय मिळवत हंगामाची विजयी सुरुवात केली.
(Stephen Fleming Confirm No Injury Of MS Dhoni Against Gujarat Titans)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नाणेफेकीवेळी रवी शास्त्रींकडून मोठी चूक, पंड्याला म्हटले ‘या’ महिला संघाचा कर्णधार, तोही हसला; Video
पंड्यालाही भरली पुणेकर ऋतुराजची धडकी; विजयानंतर म्हणाला, ‘असं वाटत होतं आम्ही त्याला…’