---Advertisement---

इंग्लंडच्या ‘प्लेइंग ११’ मध्ये व्हावेत ‘हे’ फेरबदल, माजी इंग्लिश क्रिकेटरने निवडला संघ

---Advertisement---

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारतीय संघ मजबूत स्थितीसह १-० ने आघाडीवर आहे. पहिला कसोटी सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णित राहिला. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात यजमान संघावर १५१ धावांनी विजय मिळवला. त्यामुळे भारतीय संघ या मालिकेत सध्या मजबूत स्थितीत आहे. इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील तिसरा कसोटी सामना बुधवारी (२५ ऑगस्ट) लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर सुरू होणार आहे.

यादरम्यान तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वीच इंग्लंडच्या अडचणीत वाढ झाली आहे. स्टुअर्ट ब्रॉडनंतर आता इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूड देखील दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या संघात अंतिम ११ मध्ये अनेक फेरबदल दिसू शकतात.

याबाबतच इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू स्टीव्ह हार्मिसनने तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडचा त्याचा अंतिम ११ खेळाडूंचा संघ निवडला आहे. विशेष म्हणजे यामध्ये त्यानी मोइन अली या फिरकीपटूसोबत केवळ ३ वेगवान गोलंदाजांना निवडले आहे.

पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधील खराब प्रदर्शनामुळे डॉमिनिक सिब्ली आणि जॅक क्रॉलीला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. यांच्या ऐवजी इंग्लंडने स्फोटक फलंदाज डेविड मलानला संघात स्थान दिले आहे. तर दुखापतग्रस्त मार्क वूडऐवजी साकिब महमूद आणि क्रेग ओवरटन यांच्यातील एका गोलंदाजाला भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात संधी मिळू शकते.

हार्मिसनने मागील २०१८ सालच्या इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील कसोटी मालिकेत हिरो राहिलेला, तसेच मालिकावीराचा पुरस्कार प्राप्त झालेल्या सॅम करनला आपल्या अंतिम ११ च्या संघातून वगळले आहे. करनने मागील मालिकेत इंग्लंडला ४-१ ने विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र, यंदाच्या मालिकेत करनचे फलंदाजी सोबत गोलंदाजीत देखील असमाधानकारक प्रदर्शन राहिले.

हार्मिसननी त्याच्या अंतिम ११ मध्ये सलामीचे फलंदाज म्हणून रोरी बर्न्स आणि हसीब हमीद यांना निवडले आहे. तसेच डेविड मलानलाही त्याने निवडले आहे. तर मधल्या फळीत कर्णधार जो रूट सोबत पाचव्या स्थानासाठी ओली पोपला संधी दिली आहे. तर गोलंदाजी विभागात फिरकीपटू मोइन अलीसह क्रेग ओवरटन, ओली रोबिन्सन आणि जेम्स अँडरसन यांना सामील केले आहे.

हार्मिसन यांनी त्यांच्या संघात केवळ ३ वेगवान गोलंदाज आणि एका फिरकीपटूला स्थान दिले आहे. अशाच केवळ ४ गोलंदाजांचा इंग्लंडचा संघ भारतीय संघावर वर्चस्व ठेवू शकतो का? असा सवाल देखील उपस्थित होतो. तसेच इंग्लंडचा संघ मालिकेत टिकून राहण्यासाठी तिसऱ्या कसोटी सामन्यात काय काय बदल करणार हे बघावे लागेल.

स्टीव्ह हार्मिसनचा भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठीचा अंतिम ११ चा संघ
हसीब हमीद, रोरी बर्न्स, डेव्हिड मलान, जो रूट (कर्णधार), ओली पोप, जॉनी बेयरस्टो, जोस बटलर, मोइन अली, ओली रोबिन्सन, क्रेग ओवरटन आणि जेम्स अँडरसन.

महत्वाच्या बातम्या –
भारीच ना! पृथ्वीने ‘किंग’ कोहली अन् संघसहकाऱ्यांसोबत वर्कआऊट करतानाचा फोटो केला शेअर, म्हणाला…
यूएस ओपन विजेत्या खेळाडूंच्या बक्षिस रकमेत केली गेली कपात, मात्र युवा खेळाडूंची होणार चांदी
संघसहकाऱ्याची गोलंदाजी पाहून बाबर आझमही झाला घायाळ; प्रशंसा करत म्हणाला, ‘हाय हाय मजे’

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---