ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने तिसऱ्या कसोटीवरही आपली पकड घट्ट केली आहे. ज्यामध्ये प्रथम ट्रॅव्हिस हेडने शतक केले. त्यानंतर स्टीव्ह स्मिथनेही शतक केले. स्टीव्ह स्मिथला आपल्या शतकानंतर मोठी खेळी करता आले नसले तरी तो भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या पुढे गेला आहे. आता स्मिथ केन विल्यमसनच्या बरोबरीने आला आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेत स्टीव्ह स्मिथ पहिल्या दोन सामन्यात फ्लाॅप ठरला होता. मात्र आता तिसऱ्या सामन्यात त्याची बॅट चांगलीच तळपली आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जाणारा हा सामना जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत खेळवला जात आहे. यामध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज जो रूट आहे. ज्याने आतापर्यंत 64 सामने खेळल्यानंतर 18 शतके झळकावली आहेत. विशेष म्हणजे जो रूटच्या आसपास दुसरा फलंदाज नाही. या यादीत दुसरे नाव 11 शतके झळकावणाऱ्या मार्नस लॅबुशेनचे आहे. न्यूझीलंडचा केन विल्यमसन आणि स्टीव्ह स्मिथ यांच्या नावे आता प्रत्येकी 10 शतके आहेत. केन विल्यमसनला दहा शतके झळकावण्यासाठी केवळ 28 सामन्यांची गरज लागली, स्टीव्ह स्मिथला दहा शतके झळकावण्यासाठी 48 सामने लागले.
रोहित शर्माबद्दल बोलायचे झाले तर त्याने आतापर्यंत 39 सामने खेळून 9 शतके ठोकली आहेत. जर आपण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील धावांबद्दल बोललो तर त्यातही स्टीव्ह स्मिथ रोहित शर्माच्या पुढे आहे. स्टीव्ह स्मिथने 3606 धावा केल्या आहेत. तर रोहित शर्माने 2694 धावा केल्या आहेत. आता ट्रॅव्हिस हेडही रोहित शर्माच्या जवळ आला आहे. ज्याने या चॅम्पियनशिपमध्ये आतापर्यंत 8 शतके झळकावली आहेत.
या सामन्यात टीम इंडिया बॅकफूटवर आहे. जसप्रीत बुमरामने बॅक टू बॅक विकेट घेतल्या तरीही ऑस्ट्रेलियाने 400 हून अधिक धावा केल्या. आता गरज आहे ती भारतीय संघानेही पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारण्याची, जेणेकरून सामना वाचवता येईल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी टीम इंडियाला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे.
हेही वाचा-
ट्रॅव्हिस हेड पुन्हा डोकेदुखी, स्मिथनं संपवला शतकाचा दुष्काळ; असा राहिला गाबा कसोटीचा दुसरा दिवस
IND vs AUS: गाबा कसोटीच्या मध्यावर हे 3 गोलंदाज भारतात परतणार, मोठे कारण उघड
शतकासह ट्रॅव्हिस हेडचा गाबामध्ये मोठा विक्रम, अशी कामगिरी करणारा इतिहासातील पहिलाच खेळाडू!