---Advertisement---

क्रिकेट शिकणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, स्टिव्ह स्मिथ देतोय ऑनलाईन क्रिकेट प्रशिक्षण

---Advertisement---

आयसीसी कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ हा अव्वल क्रमांकावर विराजमान आहे. स्मिथला जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्येही गणले जाते. तो त्याच्या दमदार फलंदाजीने गोलंदाजांना चिंतेत टाकत असतो. मात्र, आनंदाची गोष्ट ही आहे की, हाच फलंदाज आता त्याच्या फलंदाजी शैलीचे सर्वांना ऑनलाईन प्रशिक्षण देत आहे. Steve smith starts his online cricket coaching.

कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जवळपास सर्व क्रिकेटपटू आपापल्या घरात अडकले आहेत. त्यामुळे घरी वेळ घालवण्यासाठी सोशल मीडिया लाईव्ह अशा गोष्टी ते करत आहेत. अशात, ऑस्ट्रेलियाच्या स्टार फलंदाजाने सर्वांपेक्षा वेगळा मार्ग अवलंबत, ऑनलाईन प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे.

स्मिथने त्याच्या पहिल्या ऑनलाईन क्लासमध्ये क्रिकेट शिकणाऱ्या खेळाडूंना ड्राईव्ह करण्याची योग्य पद्धत सांगितली. त्याचबरोबर चेंडूचा स्विंग कसा ओळखायचा आणि त्यावेळी कशा प्रकारे ड्राईव्ह करावे हेही त्याने सांगितले.

३० वर्षांच्या स्मिथने ३ मिनिटाचा हा व्हिडिओ आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. त्यासोबत कॅप्शन देत त्याने लिहिले आहे की, “मला खूप लोकांनी फलंदाजीच्या काही टिप्स देण्यास सांगितले होते. हा व्हिडिओ मी ज्याला पहिली अधिकृत स्विंग मानतो त्यावरील आहे. मी काही दिवसात फलंदाजीच्या दुसर्‍या स्विंगची पद्धत देखील शेअर करेन. तुम्हाला काय बघायचे आहे ते सांगा.’

https://www.instagram.com/p/B_376BpJ9k_/

स्मिथने या व्हिडिओत बॅटला ड्राईव्ह करणे आणि पायांच्या योग्य हालचालींविषयी सांगितले आहे. याबरोबरच स्मिथने बॅटला ड्राईव्ह करताना वेगवेगळ्या वेळेला अपर हॅन्ड आणि बॉटम हॅन्डचा कसा वापर करायचा, याविषयीही प्रशिक्षण दिले आहे.

ट्रेंडिंग घडामोडी-

धोनीची ती रिऍक्शन पाहून भारताचा वेगवान गोलंदाज जाम घाबरला होता

वय केवळ २६ वर्षेे; किडनी, लिव्हर झालेत फेल आता कोरोना पॉझिटिव्हही…

रोहित-विराट नाही तर ‘या’ क्रिकेटपटूने मारले आहेत टी२०…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---