---Advertisement---

स्टिव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियाकडून पुनरागमन करत एका हाताने घेतला शानदार झेल, पहा व्हिडिओ

On: मंगळवार, मे 7, 2019 6:04 PM
---Advertisement---

मागीलवर्षी चेंडू छेडछाड प्रकरणामुळे 1 वर्षांची बंदी झेलल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि माजी उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांनी ऑस्ट्रेलिया संघात पुनरागमन केले आहे. या दोघांचाही 2019 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाच्या 15 जणांच्या संघात समावेश आहे.

या विश्वचषकाआधी ऑस्ट्रेलियाचा संघ न्यूझीलंड एकादश संघाविरुद्ध सराव सामना खेळत आहे. या दोन संघात सोमवारी(6 मे) ब्रिस्बेनमध्ये एक सराव सामना पार पडला. या सामन्यात स्मिथने क्षेत्ररक्षण करताना एका हाताने शानदार झेल घेतला. याचा व्हिडिओ cricket.com.au ने ट्विटरवर शेअर केला आहे.

या सामन्यातील 33 व्या षटकात जेसन बेऱ्हेंडॉर्फ गोलंदाजी करत होता. त्याने टाकलेला एक चेंडू फलंदाजी करणाऱ्या टॉम लॅथमच्या बॅटची कड घेऊन स्मिथ क्षेत्ररक्षण करत असलेल्या बाजूला उडाला. स्मिथनेही चूक न करता पळत जाऊन उडी मारली आणि एका हाताने तो चेंडू झेलला. त्यामुळे लॅथमला आपली विकेट गमवाली लागली.

https://twitter.com/cricketcomau/status/1125229573166133248

या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 46.1 षटकात सर्वबाद 215 धावा केल्या. त्यांच्याकडून टॉम ब्लंडेलने सर्वाधिक 77 धावा केल्या आणि विल यंगने 60 धावांची खेळी केली. तसेच ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत जेसन बेऱ्हेंडॉर्फ, पॅट कमिन्स आणि नॅथन कुल्टर नाईलने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या, तर ऍडम झम्पाने 1 विकेट घेतली.

216 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार ऍरॉन फिंचने 64 चेंडूत 52 धावा केल्या. वॉर्नरने छोटेखानी खेळी करताना 6 चौकार आणि 1 षटकारांच्या मदतीने 39 धावा केल्या, तर स्मिथने 43 चेंडूत 22 धावा केल्या. यात त्याने 2 चौकार मारले.

पण नंतर ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीतील फलंदाजांनीही नियमित कालांतराने विकेट गमावल्याने तळातल्या फलंदाजांवर धावा करण्याची जबाबदारी आली. ही जबाबदारी योग्यरितीने पेलताना नॅथन कुल्टन नाईलने 34 धावा केल्या. तसेट ऍडम झम्पा आणि बेऱ्हेंडॉर्फने शेवटच्या विकेटसाठी 14 धावांची नाबाद भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला 1 विकेटने विजय मिळवून दिला.

न्यूझीलंडकडून गोलंदाजीत मॅट हेन्रीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच जेम्स निशाम आणि टॉड ऍस्टलने प्रत्येकी 2 विकेट, तर हामिश बेनेट आणि डॉ ब्रेसवेलने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या –

सनरायझर्स हैद्राबादच्या चाहत्यांनी असे मजेदार ट्विट करत मानले मुंबई इंडियन्सचे आभार…

उमेश यादवच्या नो बॉल प्रकरणानंतर अंपायरने रागात तोडला दरवाजा

२०१९ विश्वचषकासाठी ‘युनिवर्स बॉस’ ख्रिस गेलवर नवीन जबाबदारी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment