30 मेपासून विश्वचषक 2019 ची स्पर्धा इंग्लंड आणि वेल्समध्ये रंगणार आहे. या स्पर्धेसाठी वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने तडाखेबाज सलामीवीर फलंदाज ख्रिस गेलवर वेस्ट इंडिज संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे.
त्यामुळे या विश्वचषकासाठी वेस्ट इंडिजचे नेतृत्व जेसन होल्डर करेल तर गेल उपकर्णधारपद सांभाळेल. गेलचा हा 5 वा विश्वचषक असून त्याने आत्तापर्यंत 289 वनडे सामने खेळले आहेत. तसेच यात 25 शतके आणि 51 अर्धशतकांसह 10151 धावा केल्या आहेत.
उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आल्यानंतर गेल म्हणाला, ‘वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व करने माझ्यासाठी सन्मान आहे. वरिष्ठ खेळाडू म्हणून कर्णधाराला आणि संघातील अन्य खेळाडूंना पाठिंबा देणे ही माझी जबाबदारी आहे.’
‘हा कदाचित सर्वोत मोठा विश्वचषक असणार आहे. त्यामुळे खूप अपेक्षाही असतील आणि मला माहित आहे आम्ही वेस्ट इंडिजमधील लोकांसाठी चांगली कामगिरी करु.’
सध्या वेस्ट इंडिजचा संघ बांगलादेश आणि आयर्लंड विरुद्ध तिरंगी वनडे मालिका खेळत आहे. पण या मालिकेत आंद्रे रसल, गेल हे स्टार खेळाडू सहभागी झालेले नाही. ते आयपीएलमध्ये व्यस्त होते. या वनडे मालिकेत वेस्ट इंडिज संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी शाय होप सांभाळत आहे.
वेस्ट इंडिजचा विश्वचषक 2019 मधील पहिला सामना 31 मे ला पाकिस्तान विरुद्ध होणार आहे.
विश्वचषक 2019 साठी असा आहे वेस्ट इंडिजचा संघ –
जेसन होल्डर (कर्णधार), ख्रिस गेल(उपकर्णधार), आंद्रे रसल, शेल्डन कॉटरेल, शॅनन गॅब्रिएल, केमार रोच, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), ऍशले नर्स, फॅबियन ऍलन, शिमरॉन हेेटमर, शाय होप (यष्टीरक्षक), ओशन थॉमस, कार्लोस ब्रॅथवेट, डॅरेन ब्राव्हो , इव्हिन लुईस.
महत्त्वाच्या बातम्या –
–रोहित शर्माने अनोखे सेलिब्रेशन करत अर्धशतक केले लेकीला समर्पित, पहा व्हिडिओ
–एमएस धोनी मतदानासाठी रांचीत, लेक झिवाने मतदान करण्याचे नागरिकांना केले आवाहन, पहा व्हिडिओ
–विराट कोहलीने त्याची विकेट घेणाऱ्या खलील अहमदची अशी उडवली खिल्ली, पहा व्हिडिओ