---Advertisement---

उमेश यादवच्या नो बॉल प्रकरणानंतर अंपायरने रागात तोडला दरवाजा

On: मंगळवार, मे 7, 2019 2:56 PM
---Advertisement---

आयपीएल 2019 च्या या मोसमात सुरुवातीपासूनच पंच आणि खेळाडूंमध्ये वाद झालेले पहायला मिळाले आहेत. शनिवारी(4 मे) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद संघात झालेल्या सामन्यातही पंच आणि खेळाडूमध्ये वादावादी झाल्याचे दिसले.

या सामन्यात मैदानावरील पंच निगल लॉन्ग यांच्याशी बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली आणि उमेश यादवचे सनरायझर्स हैद्राबाद संघ फलंदाजी करत असताना 20 व्या षटकात वाद झाले. या वादानंतर लॉन्ग यांनी एम चिन्नास्वामी स्टेडियममधील पंचाच्या खोलीच्या दरवाजाला जोरात लाथ मारली आणि तो दरवाजा खराब केला.

झाले असे की 20 व्या षटकात यादव गोलंदाजी करत होता. त्याने या षटकात टाकलेला पाचवा चेंडू लॉन्ग यांनी नो बॉल असल्याचा निर्णय दिला. पण जेव्हा या नोबॉलचा रिप्ले दाखवण्यात आला तेव्हा दिसले की यादवची टाच क्रिजच्या आत होती.

त्यामुळे यादवने लॉन्ग यांच्यावर नाराजी व्यक्त केली. पण लॉन्ग यांनी निर्णय न बदलता यादवला त्याची गोलंदाजी कायम करण्यास सांगितले. लॉन्ग यांच्या निर्णयावर विराटनेही नाराजी व्यक्त केली.

काही साक्षिदारांच्या अनुसार हैद्राबादची फलंदाजी संपल्यानंतर लॉन्ग यांनी पंचाच्या खोलीमध्ये येत दरवाजावर राग व्यक्त केला. यावेळी त्यांनी दरवाजावर लाथ मारली. यामुळे दरवाजाची अवस्था खराब झाली आहे.

त्यामुळे या प्रकरणाची माहिती कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने सामनाधिकारी नारायण कुट्टी यांना दिली आहे.

तसेच लॉन्ग यांनी कर्नाटक क्रिकेट असोसिएशनशी चर्चा करुन 5 हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून दिले आहेत.

इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनचे सचिव सुधारकर राव यांनी या प्रकरणाबाबत म्हटले आहे की ‘ही खूप दूर्दैवी घटना होती. सामन्यानंतर मी सामनाधिकाऱ्यांना भेटला. आम्ही यावर चर्चा केली आहे आणि आम्ही या प्रकरणाची माहिती सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयसाठी नेमुन दिलेल्या समीतीला(सीओए) देणार आहोत.’

महत्त्वाच्या बातम्या –

२०१९ विश्वचषकासाठी ‘युनिवर्स बॉस’ ख्रिस गेलवर नवीन जबाबदारी

रोहित शर्माने अनोखे सेलिब्रेशन करत अर्धशतक केले लेकीला समर्पित, पहा व्हिडिओ

एमएस धोनी मतदानासाठी रांचीत, लेक झिवाने मतदान करण्याचे नागरिकांना केले आवाहन, पहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment