बुधवारी (दि. 05 जुलै) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने कसोटी रँकिंग जाहीर केली. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथ कसोटी रँकिंगमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. लॉर्ड्स कसोटी सामन्यात 110 धावांची शतकी खेळी केल्यानंतर स्मिथने हा क्रमांक पटकावला. मात्र, न्यूझीलंड संघाचा दिग्गज फलंदाज केन विलियम्सन कसोटी रँकिंगमध्ये अव्वलस्थानी विराजमान झाला आहे. त्याने जो रूट याला पछाडत हा कारनामा केला आहे.
स्टीव्ह स्मिथ याने लॉर्ड्स कसोटी (Lord’s Test) सामन्यात 110 आणि 34 धावांची खेळी साकारत सामनावीर पुरस्कार पटकावला. यामुळे त्याला आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये चार स्थानांचा फायदा होत थेट दुसऱ्या स्थानी विराजमान होण्याची संधी मिळाली. स्मिथ शेवटचा जून 2021मध्ये कसोटी रँकिंगध्ये अव्वलस्थानी राहिला होता. त्यावेळी त्याने केन विलियम्सन याने पुन्हा मागे टाकण्यापूर्वी काही आठवडे विलियम्सनची जागा घेतली होती.
An entertaining #Ashes Test at Lord’s led to major changes at the top of the @MRFWorldwide ICC Men’s Test Batting Rankings ????#ICCRankings | Details ????https://t.co/zI3BcvjVnJ
— ICC (@ICC) July 5, 2023
दुसरीकडे, रूट हा फक्त 10 आणि 18 धावाच करू शकला. त्यामुळे तो पाचव्या स्थानी घसरला आहे. त्यामुळे विलियम्सन याने पुन्हा अव्वल क्रमांक पटकावला. अव्वल क्रमांक पटकावण्याची ही त्याची सहावी वेळ होती. तो सर्वात पहिल्यांदा नोव्हेंबर 2015मध्ये अव्वलस्थानी विराजमान झाला होता. तसेच, शेवटचा ऑगस्ट 2021मध्ये अव्वल कसोटी फलंदाज बनला होता.
आयसीसी कसोटी रँकिंगमधील गुणांबद्दल बोलायचं झालं, तर अव्वलस्थानी असलेल्या विलियम्सनचे 883 गुण आहेत. स्मिथ विलियम्सनपेक्षा फक्त एक गुण मागे आहे. त्याचे 882 गुण आहेत. तसेच, तिसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लॅब्यूशेन असून त्याचे 873 गुण आहेत. याव्यतिरिक्त चौथ्या स्थानी ट्रेविस हेड असून त्याचे 872 गुण आहेत.
इंग्लंडचा फलंदाज बेन डकेट याने 24व्या स्थानावरून पहिल्यांदाच कारकीर्दीत थेट अव्वल 20मध्ये झेप घेतली आहे. तो 18व्या स्थानी विराजमान झाला आहे. त्याने दुसऱ्या ऍशेस कसोटी (Ashes Test) सामन्यात 98 आणि 83 धावांची खेळी केल्यानंतर हे स्थान पटकावले. दुसरीकडे, बेन स्टोक्स याने दुसऱ्या कसोटीत 155 धावांची खेळी साकारल्यामुळे त्याला 9 स्थानांचा फायदा झाला. तो कसोटी रँकिंगमध्ये 23व्या स्थानी विराजमान झाला आहे. विशेष म्हणजे, पहिल्या दहा खेळाडूंच्या यादीत 10व्या स्थानी रिषभ पंत असून त्याचे 758 गुण आहेत. (Steve Smith surges ahead but Kane Williamson tops in MRF Tyres ICC Men’s Test Player Rankings)
महत्वाच्या बातम्या-
‘आता तरी लाज वाटू दे बुमराह’, सर्जरीनंतर लेकीसोबत क्रिकेट खेळणाऱ्या विलियम्सनच्या व्हिडिओवर चाहत्याची कमेंट
अब आयेगा मजा! 1 स्थानासाठी भिडणार नेदरलँड-स्कॉटलंड, कुणाला आणि कसे मिळणार विश्वचषकाचे तिकीट? वाचा