डेविड वॉर्नर पाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने आपल्या भविष्यातील क्रिकेटबाबत मोठे भाष्य केले आहे. ऑस्ट्रेलियाच्या या रनमशीनने अद्यापही निवृत्ती घेण्याचा विचार करत नाही, मात्र त्याची कारकिर्द थोडीच बाकी आहे हे त्याने मान्य केले आहे. क्रिकेटच्या मैदानावर आपल्या व्यक्तिमत्वाने गोलंदाजांना त्रास देणाऱ्या आणि प्रत्येक चेंडूच्या आधी आपले ग्लोव्ह्ज, पॅड आणि हेल्मेट एडजस्ट करणारा स्टीव्ह स्मिथ हा ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे.
स्टीव स्मिथ (Steve Smith) याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरूवात 2010मध्ये केली. तेव्हापासून त्याने 87 कसोटी सामने खेळताना 60पेक्षा अधिकच्या सरासरीने 8161 धावा केल्या. ज्यामध्ये 28 शतकांचा समावेश आहे. तसेच त्याने आतापर्यंत 136 वनडे सामने आणि 63 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. टी20 संघात त्याला जागा कायम करणे जमले नसले तरी तो वनडे आणि कसोटी संघाचा महत्वाचा भाग आहे. एका माध्यमाला मुलाखत देताना त्याने म्हटले अजून खूप क्रिकेट बाकी आहे.
स्मिथने म्हटले, “सध्यातरी मी निवृत्तीबाबत कोणताही विचार केलेला नाही, मात्र मी 33 वर्षाचा आहे. 13 वर्षापासून क्रिकेट खेळत असून हा खूप मोठा कालावधी आहे. मी अजूनही क्रिकेट खेळण्याचा आनंद घेत असून मला माहित आहे शेवट जवळ आला आहे आणि हे निश्चित आहे.”
स्मिथ हा ऑस्ट्रेलियाच्या महान कसोटी फलंदाजांपैकी एक आहे. संघासाठी सर्वाधिक कसोटी शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो पाचव्या स्थानावर आहे. त्यामध्ये डॉन ब्रॅडमन (29), मॅथ्यू हेडन (30) स्टीव वॉ (32), आणि रिकी पॉंटिंग (41) हे आहेत.
स्मिथला माहित आहे की त्याच्यावर दबाव असणार कारण युवा खेळाडू उत्तम कामगिरी करत आहेत. जेव्हा तो केपटाऊन येथे झालेल्या बॉल टेम्परिंगमध्ये दोषी आढळला होता, तेव्हा त्याच्यावर एका वर्षाची बंदीही घातली होती. त्यानंतर त्याचे करियर जसे हवे तसे लयीत परतले नाही. आता भारतात खेळल्या जाणाऱ्या वनडे विश्वचषक आणि कसोटी मालिकेवर त्याचे लक्ष आहे. Steve Smith Talk About Retirement and his Future Of Cricket
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
डोळ्यांवर काळा चश्मा अन् टीमची जर्सी घालत हार्दिक-केनची ‘क्रोकोडाईल बाइक राइड’; VIDEO व्हायरल
NZvIND: जाणून घ्या भारत-न्यूझीलंड टी20 मालिकेचे वेळापत्रक, संघ एकाच क्लिकवर