ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सध्या ऍशेस मालिका (ashes series) खेळली जात आहे. मालिकेतील पहिले चार सामने पार पडले आहेत आणि उर्वरित एक सामना शुक्रवारी (१४ जानेवारी) होबार्टमध्ये सुरू होणार आहे. हा पाचवा सामना सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघात महत्वाचा बदल झाला आहे. ट्रेविस हेडला (travis head) संघात सामील केले आहे. हेडने संघात पुनरागमन केल्यामुळे मार्कस हॅरिसला (marcus harris) संघातून बाहेर केले गेले. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने हेडने संघात पुनरागमन केल्याची पुष्टी केली.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना डे-नाइट असणार आहे. ऑस्ट्रेलियाने मालिकेतील पहिल्या तीन म्हणजेच ब्रिस्बेन, एडिलेड आणि मेलबर्न या कसोटी सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे आणि मालिकेत ३-० अशी आघाडी देखील घेतली आहे. मालिकेती चौथा कसोटी सामना सिडनीमध्ये खेळला गेला. जो अनिर्णीत राहिला होता.
ऑस्ट्रेलियाने पाचवा कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी फलंदाजीतील बदल समोर आणले. मात्र, गोलंदाजीविषयी अद्याप स्पष्टता आलेली नाही. असे सांगितले जात आहे की, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज स्कॉट बोलंडच्या फिटनेसविषयीची चाचणी झाल्यानंतर गोलंदाजी विभागाविषयी संघ निर्णय घेणार आहे.
दरम्यान, हेड सिडनीमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात सहभागी होऊ शकला नव्हता, कारण यादरम्यान त्याला कोरोनाची लागण झाली होती. परंतु, पाचव्या कसोटीत आपण त्याला उस्मान ख्वाजासोबत फलंदाजी करताना पाहू शकतो. ख्वाजाने सिडनीतील पहिल्या डावात १३७ आणि दुसऱ्या डावात नाबाद १०१ धावा ठोकल्या होत्या. तसेच हॅरिसने मालिकेतील पहिल्या चार सामन्यांमध्ये ३० पेक्षा कमी सरासरीने १७९ धावा केल्या होत्या.
हेडने संघात पुनरागमन केल्यानंतर ख्वाजा ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात करेल. तर, हेड पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसू शकतो. सलामीवीराच्या रूपात ख्वाजाचा इतिहात पाहिला, तर तो अप्रतिम आहे. त्याने ऍशेस मालिकेतील सात डावांमध्ये ४८४ धावा केल्या आहेत, यामध्ये दोन अर्धशतके आणि दोन शतकांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२२ स्पर्धेपूर्वी ‘या’ दोन संघांचा मोठा पराक्रम! लोकप्रियतेच्या बाबतीत टॉप-१० मध्ये स्थान
वेस्ट इंडिजमध्ये रंगणार १९ वर्षाखालील विश्वचषकाचा थरार, ‘या’ ५ भारतीय खेळाडूंवर असेल सर्वांचे लक्ष
‘हिटमॅनला बोलवा रे!’, राहुल – मयांकच्या जोडीच्या फ्लॉप शोनंतर नेटकऱ्यांच्या मागणीला जोर
व्हिडिओ पाहा –