क्रिकेटचा एक किस्सा आहे १९७१ मधील, जेव्हा भारतीय संघ इंग्लंडच्या दौर्यावर गेला होता. नवाब मन्सूर अली खान पतौडीचा खराब फॉर्म आणि अपघातामुळे नजर कमी झालेली असताना हा दौरा भारतीय संघ करत होता. आता संघाच्या नेतृत्वाची कमान मुंबईकर अजित वाडेकर यांच्यावर आली होती.
या दौऱ्याआधी वाडेकरांच्या नेतृत्वात भारतीय संघाने वेस्ट इंडिजमध्ये कसोटी मालिका १-० ने जिंकली होती. आता भारतीय संघाला इंग्लंडला जावे लागणार होते. त्यावेळी इंग्लंड हा जगातील पहिल्या क्रमांकाचा संघ होता. मालिका सुरू झाली आणि इंग्लंडमधील पहिल्या दोन कसोटी सामने इतके रोमांचक झाले होते की कोणाच्याही खात्यात जाऊ शकत होते. पण भारतीय संघाने दोन्ही सामने अनिर्णीत ठेवले.
आता तिसरी कसोटी ओव्हल मैदानावर खेळली जाणार होती. सामना १७ ऑगस्टला सुरू झाला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ३५५ धावा केल्या. दिलीप सरदेसाई आणि फारूक इंजिनिअर यांच्या अर्धशतकांसह भारताने इंग्लंडलाही चोख प्रत्युत्तर दिले. परंतु सामन्याचे ३ दिवस संपले आणि भारताचा पहिला डाव अजून सुरूच होता. असे दिसते की हा सामना इतर दोन कसोटी सामन्यांप्रमाणे अनिर्णीत सुटेल.
चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वीच खेळाडू वार्मअप करत होते. तेवढ्यात शेजारच्या रशियन सर्कसची बेला नावाची हत्तीण एका बाईसह मैदानावर आली. ती सर्व मैदानावर फिरू लागते. कर्णधार वाडेकर यांचे लक्ष न गेल्याने भारतीय संघाचे मॅनेजर वाडेकरांकडे येऊन त्यांना हत्ती दाखवतात आणि म्हणाले –
“अजित, ही चांगली संधी आहे. गणेश चतुर्थीचा दिवस आहे आणि प्रत्येक्षात गणपती बाप्पा येथे आले आहेत, आपल्याला हत्तीचे दर्शन झाले. आज आपण त्याच्या आशीर्वादाने हा सामना नक्की जिंकू शकतो.”
आता मुंबईकर अजित वाडेकर यांना त्यातून प्रेरणा मिळाली की काय घडले ते कळले नाही. २८४ धावांवर सर्व बाद होऊन ७१ धावांनी पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाने सामन्यात पुनरागमन केले.
त्या सामन्यात भागवत चंद्रशेखरने इतके अप्रतिम गोलंदाजी केली, की इंग्लंडचा संघ त्यांच्या गोलंदाजीच्या जाळ्यात अडकला. त्या वेळी चंद्रशेखरने एक-दोन नव्हे तर सहा बळी घेतले. त्यामुळे इंग्लंडचा संघ केवळ १०१ धावांवर बाद झाला.
म्हणजेच भारतासमोर इंग्लंडने इंग्लंडमधील पहिल्या मालिकेच्या विजयासाठी केवळ १७३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरादाखल भारतीय संघाचे फलंदाज लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदनावर आले. दिलीप सरदेसाई यांच्यासमवेत अजित वाडेकर यांनी त्याच दिवशी संघाला विजयाच्या जवळ आणले. पण वाडेकर ४५ धावा काढून बाद झाले. माघारी परातल्यानंतर वाडेकर ड्रेसिंग रूममध्ये गेले आणि झोपले.
आता विजयासाठी संघाला ९७ धावांची गरज होती. नंतर गुंडप्पा विश्वनाथ (३३) आणि फारूक इंजिनिअर (२८ धावा) यांनी भारताला सामना सहज जिंकून दिला.
भारतीय संघाच्या विजयाने इंग्लंडचे तत्कालीन मॅनेजर केन बॅरिंगटन इतके उत्साही झाले की तो थेट ड्रेसिंग रूममध्ये वाडेकर यांच्याकडे आले. त्यांनी वाडेकरांना झोपेतून उठविले आणि म्हणाले –
अजित, गेटअप. यू हेव वॉन फोर दि फर्स्ट टाइम.”
(जागे हो अजित, तुम्ही पहिल्यांदा विजय मिळवला आहे.)
भारतीय संघ जिंकून परतल्यावर, चाहत्यांनी सांताक्रूझ विमानतळ ते वानखेडे स्टेडियम दरम्यान संपूर्ण रस्ता भरला होता. १९८३ किंवा २०११ च्या विजयाच्या अगोदरही भारतीय क्रिकेटमध्ये असे चित्र पाहिले गेले होते.