कबड्डी म्हटले की, शरीराची कसरत आणि दररोजचा सराव करणे आवश्यकच असते. यासोबत इच्छाशक्ती आणि बौद्धिक चातूर्य असणे देखील तितकेच आवश्यक असते. या सर्व गोष्टी आत्मसात करत आणि प्रचंड मेहनत घेत महाराष्ट्राच्या एका गरीब कुटूंबातील मुलीने राष्ट्रीय पातळीवर आपले नाव गाजवले आहे. आज त्याच लाल मातीतील वाघिणीची जीवन गाथाआपण पाहणार आहोत.
अतिशय हालाखीची परस्थिती असतानाही अंतरी असलेली कबड्डी खेळण्याची प्रचंड जिद्द ,या जोरावर मुंबईच्या सोनाली शिंगटे हीने तिचे स्वप्न पुर्ण केले आहे. एकेकाळी बूट घेण्यासाठी देखील पैसे नसलेली ही मुलगी पुढे राष्ट्रीय कबड्डीपटू बनली. तीची संघर्षगाथा निश्चितच सर्वांसाठी प्रेरक आहे.
दररोज सकाळी मैदानावर सराव करून संध्याकाळी सोनाली सामना खेळण्यासाठी जात असे. कुटुंबातील सदस्यांचे तर स्पष्ट म्हणणे होते की, खेळ एका बाजूला आणि शिक्षण एका बाजूला. अशा परिस्थितीत सोनाली सराव करून झाल्यानंतर रात्री उशीरा अभ्यासाला बसत असे.
सोनालीचे वडील हे सुरक्षारक्षकाची नोकरी करत. तर, आई छोटसं स्टोअर सांभाळत असे. अशा हलाखीच्या परिस्थितीतून पुढे जात सोनालीने मिळवलेले हे यश नक्कीच कौतुकास्पद आणि आदर्शवत असेच आहे.
कुटुंबाची हालाखीची परिस्थिती असल्यामुळे क्रिकेट खेळण्याचे स्वप्न राहिले अपूर्ण
सोनाली शिंगटे हिचा जन्म दिनांक २७ मे १९९५ रोजी मुंबईतील लोअर परळ येथे झाला. तिने तिचे महाविद्यालयीन शिक्षण महर्षी दयानंद कॉलेजमध्ये पूर्ण केले. तिला खरेतर लहानपणापासून क्रिकेटची आवड होती. मात्र, क्रिकेटमध्ये करियर म्हणजे भरपूर खर्च या समजुतीमुळे तिचे क्रिकेट खेळण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले.
राजेश पाडावे यांच्या मार्गदर्शनाखाली कबड्डीचे धडे गिरवायला सुरुवात
कॉलेजात असताना तीने कबड्डी खेळण्यास सुरुवात केली. त्यावेळी स्थानीय क्रीडा मंडळ, शिव शक्ती महिला संघ येथे राजेश पाडावे यांच्या मार्गदर्शनाखाली सोनालीने कबड्डीचे धडे गिरवायला सुरुवात केली.
राष्ट्रीय पातळीवर उत्तम कामगिरी
सन २०१८ मध्ये झालेल्या फेडरेशन कप स्पर्धेत ती इंडियन रेल्वे संघाकडून खेळत होती आणि इंडियन रेल्वे संघानेच या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. अंतिम सामन्यात इंडियन रेल्वे संघाने हिमाचल प्रदेश संघाचा पराभव केला होता. या स्पर्धेच्या जोरावर तिला भारतीय संघाच्या कॅम्पसाठी बोलावण्यात आले होते.
जकार्ता येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सोनालीची भारतीय संघात निवड झाली होती. भारतीय संघाने तेव्हा रौप्यपदकला गवसणी घातली. त्यानंतर २०१९ मध्ये काठमांडूमध्ये झालेल्या दक्षिण आशियाई स्पर्धेत भारतीय कबड्डी संघाने सुवर्ण पदक पटकावले. ज्या संघात सोनालीचाही समावेश होता.
शिव छत्रपती पुरस्कार देऊन सन्मान
सन २०१९ मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने सोनाली शिंगटे हिला राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडा पुरस्कार ‘शिव छत्रपती पुरस्कार’ देऊन गौरव केला.
महत्त्वाच्या बातम्या –
“रहाणे आणि रोहितला संघातून काढून टाकण्याची वेळ आली आहे,” चाहत्यांचा हल्लाबोल
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या समीकरणांवर विराट कोहलीची मोठी प्रतिक्रिया, म्हणाला…
दुसऱ्या कसोटीपूर्वी भारतीय संघासमोर आहेत ‘या’ चार समस्या