---Advertisement---

टी२०तील एकाहून एक मातब्बर फलंदाजांना पुरून उरला पाकिस्तानचा रिझवान, केला ‘हा’ विश्वविक्रम

On: गुरूवार, डिसेंबर 16, 2021 11:59 PM
Mohammad-Rizwan
---Advertisement---

पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तीन सामन्यांची टी-२० मालिका गुरुवारी (१६ डिसेंबर) संपली. पाकिस्तानने तिसऱ्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडीजवर सात विकेट्स राखून विजय मिळवला. पाकिस्तान संघाचा सलामीवीर फलंदाज मोहम्मद रिजवान याने या संपूर्ण मालिकेत अप्रतिम फलंदाजीचे प्रदर्शन केल आणि एका जागतिक विक्रमाची नोंद देखील केली.

रिजवानने या सामन्यात एकूण ४५ चेंडूंचा सामना केला, यामध्ये त्याने १० चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ८७ धावा केल्या. या सामन्यात त्याने एका वर्षातील टी-२० क्रिकेटमधील २००० धावा पूर्ण केल्या आणि हा विक्रम करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने या २००० धावा ४५ डावांमध्ये ५५ पेक्षा अधिक सरासरीने आणि १३० च्या स्ट्राइक रेटने केल्या आहेत. वेस्ट इंडीजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत रिजवानने २०३ धावा केल्या आणि मालिकावीर ठरला.

या संपूर्ण वर्षांत त्याने टी-२० क्रिकेटमध्ये खेळताना तब्बल १८ शतके केली आहेत. त्याने पाकिस्तानसाठी यावर्षी खेळलेल्या पहिल्या २६ डावांमध्ये १२९३ धावा केल्या होत्या. त्यापूर्वी ऑक्टोबरमध्ये टी-२० विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात त्याने यावर्षीच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मधील १००० धावा पूर्ण केल्या होत्या.

रिजवानच्या आधी एका वर्षात सर्वाधिक टी-२० धावा करण्याचा विक्रम क्रिस गेलच्या नावावर होता. गेलने एका वर्षात १६६५ टी-२० आंतरराष्ट्रीय धावा केल्या होत्या. रिजवानने गेलचा हा विक्रम टी-२० विश्वचषकादरम्यान मोडला होता.

रिजवानसोबत सलामीला येणारा पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आजमने देखी या संपूर्ण वर्षात अप्रतिम प्रदर्शन केले आहे. बाबर यावर्षी सर्वाधिक टी-२० धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याने यावर्षी १७०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

दरम्यान, वेस्ट इंडीजविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवल्यानंतर मालिकाही जिंकली आहे. यापूर्वी टी-२० मालिकेतील पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवला होता आणि हा त्यांचा मालिकेतील सलग तिसरा विजय आहे. पाकिस्तानने टी-२० मालिकेत ३-० असा मोठा विजय मिळवला आहे.

महत्याच्या बातम्या –

पीवायसी-पुसाळकर पीवायसी प्रीमियर क्रिकेट लीग २०२१ स्पर्धेत स्कायलार्कस, डॉल्फिन्स, टस्कर्स संघांचा सलग दुसरा विजय

ट्रोलर्सला मिळाले नवीन भांडवल! अजमल-मलिकच्या ‘तू पकड, मी पकड’ प्रसंगाची पुनरावृत्ती; पाहून व्हाल लोटपोट

विराट-बीसीसीआय विवादात भाजपच्या दिग्गज नेत्याचा नवीनच सुर, सचिनप्रमाणेच ‘या’ क्रिकेटपटूंना भारतरत्न देण्याची मागणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---