न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तानच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला आज (२६ डिसेंबर) माउंट माउंगनुई येथील बे ओव्हल मैदानावर सुरुवात झाली. मात्र, या सामन्यात क्रिकेटव्यतिरिक्त एका अजब घटनेने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन फलंदाजी करत असताना एक अज्ञात व्यक्ती विवस्त्रावस्थेत मैदानावर धावत आला. त्याने हातांनी आपले जननेंद्रीय झाकत खेळपट्टीकडे धाव घेतली. या प्रकरणामुळे खेळ काही काळ थांबविण्यात आला होता. सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्याला पकडून मैदानाबाहेर नेल्यावर खेळ पूर्ववत सुरू झाला.
या प्रकरणाने खेळावर फारसा परिणाम झाला नाही. मात्र, चाहते सुरक्षा रक्षकांनी दाखवलेल्या ढिलाईवर नाराज होते. तसेच विलियम्सन दिवसाखेर ९४ धावांवर नाबाद राहिला. ते पाहून अनेक चाहत्यांनी हा व्यत्यय आला नसता, तर विलियम्सन आपले शतक पूर्ण करू शकला असता, असेही मत मांडले.
पाहा व्हिडिओ:
Sign this streaker up for the Chiefs! pic.twitter.com/vBlg4UCJ8t
— The ACC (@TheACCnz) December 26, 2020
पहिल्या दिवसाच्या खेळावर न्यूझीलंडचे वर्चस्व
बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या खेळावर न्यूझीलंडने वर्चस्व गाजवले. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने न्यूझीलंडच्या दोन्ही सलामीवीरांना स्वस्तात माघारी धाडत पाकिस्तानला चांगली सुरुवात करून दिली. मात्र त्यानंतर कर्णधार विलियम्सन आणि अनुभवी खेळाडू रॉस टेलर यांनी १२० धावांची भागीदारी करत डाव सावरला. टेलर ७० धावा करून बाद झाला. मात्र, पाचव्या क्रमांकावर आलेल्या हेन्री निकोल्स ४२ धावा करत दिवसाखेर नाबाद आहे. पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना आफ्रिदीने ५५ धावांवर ३ विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त इतर एकाही गोलंदाजाला विकेट घेण्यात यश आले नाही.
महत्वाच्या बातम्या:
– बॉक्सिंग डे कसोटी : पहिल्या दिवसाअखेर न्यूझीलंडच्या ३ बाद २२२ धावा, केन विलियम्सन शतकाच्या जवळ
– IND vs AUS : पहिल्या दिवसाखेर भारताच्या १ बाद ३६ धावा, पदार्पण करणाऱ्या शुबमन गिलची शानदार सुरुवात
– त्याची बॅट क्रीजच्या आत आलीच नव्हती, टीम पेनबाबत दिलेल्या चुकीच्या निर्णयावर शेन वॉर्नची प्रतिक्रिया