इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाचवा कसोटी सामना शनिवारी (२ जुलै) अधिक रोमांचक बनला. सामन्याच्या पहिल्या दिवशी रिषभ पंत आणि रविंद्र जडेजा यांच्यात द्विशतकीय भागीदारी झाली. पंतपाठोपाठ दुसऱ्या दिवशी जडेजानेही शतक ठोकले. यादरम्यान वेगवान गोलंदाज आणि या सामन्यात कर्णधार बनलेल्या जसप्रीत बुमराहने कसोटी क्रिकेटमध्ये टी२० प्रमाणे धुलाई केली. कसोटीत ५५० विकेट्स घेणारा इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडचा बुमराहने चांगलाच घाम काढला.
भारतीय संघाचा दिग्गज वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) या सामन्यात संघाचे नेतृत्व करत आहे. रोहितच्या अनुपस्थितीत त्याच्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली गेली आहे. नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केली, आणि बुमराहने चमकदार कामगिरी केली. त्याने इंग्लंडचा दिग्गज स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) याने टाकलेल्या एका षटकात संघाच्या धावसंख्येत तब्बल ३५ धावांची भर टाकली.
भारताच्या पहिल्या डावातील ८४ व्या षटकात बुमराहची तुफान फटकेबाजी पाहायला मिळाली. या षटकात ब्रॉडने टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर बुमराहने चौकार ठोकला. त्यानंतर ब्रॉडने चक्क पाच वाईड बॉल टाकले. पुढचा चेंडू त्याने नो बॉल टाकला, ज्यावर बुमराहने षटकार ठोकला. त्यानंतर बुमराहने पुढच्या सलग तीन चेंडूवर तीन चौकार मारले. षटकातील पाचवा चेंडूवर बुमराहने पुन्हा एकदा षटकारासाठी पाठवला. शेवटच्या चेंडूवर मात्र त्याला एक धाव घेऊन समाधान मानावे लागले.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हे सर्वात महागडे षटक ठरले आहे. यापूर्वी २००३ साली दक्षिण आफ्रिकेच्या रॉबीन पीटरसनने कसोटी सामन्याच्या एका षटकात २८ धावा खर्च केल्या होत्या. त्यावेळी दिग्गज ब्रायन लारा फलंदाजी करत होते. ब्रॉडने रॉबीन पीटसरनचा हा विक्रम मोडून स्वतःच्या नावावर केला आहे. दिग्गज जेम्स अँडरसनने देखील २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात एका षटकात २८ धावा खर्च केल्या होत्या. जॉर्ज बेली त्यावेळी फलंदाजी करत होता. दक्षिण आफ्रिकी आणि इंग्लंड यांच्यात २०२० मध्ये खेळल्या गेलल्या कसोटी सामन्यात केशव महाराजने जो रुटच्या एका षटकात २८ धावा चोपल्या होत्या.
कसोटी क्रिकेटमध्ये एका षटकात केल्या गेलेल्या सर्वाधिक धावा
३५ – जसप्रीत बुमराह (फलंदाज) विरुद्ध स्टुअर्ट ब्रॉड (गोलंदाज) – बर्मिंघम, २०२२
२८ – ब्रायन लारा (फलंदाज) विरुद्ध रॉबीन पीटरसन (गोलंदाज) – जोहान्सबर्ग, २००३
२८ – जॉर्ज बेली (फलंदाज) विरुद्ध जेम्स अँडरसन (गोलंदाज) – पर्थ, २०१३
२८ – केशव महाराज (फलंदाज) विरुद्ध जो रुट (गोलंदाज) – पोर्ट एलिझाबेत, २०२०
कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हे सर्वात महागडे षटक ठरले आहे. दिग्गज युवराज सिंगने आयसीसीने पहिल्यांदाच आयोजित केलेल्या टी-२० विश्वचषकात स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात ६ षटकार मारून ३६ धावा केल्या होत्या. बुमराहने या कसोटी सामन्यात ज्या पद्धतीने फलंदाजी केली, ती पाहून अनेकांना युवारजची आढवण नक्कीच आली आसावी.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
करियर सुरू झालं तेव्हाही बाजार अन् संपायला आलं तेव्हाही बाजार! ब्राॅडला फुल नडलेत इंडियावाले
पंत आणि जडेजाने काढला इंग्लंडचा घाम, एकाच डावात शतके ठोकत १५ वर्षांच्या कामगिरीची पुनरावृत्ती
रिषभ पंतने शतक करताच द्रविडचा दिसला कधीच न पाहिलेला अवतार, Video व्हायरल