---Advertisement---

मोहम्मद सिराजच्या घातक चेंडूवर पृथ्वी शॉ क्लिन बोल्ड, पाहा व्हिडिओ

On: मंगळवार, नोव्हेंबर 3, 2020 4:46 PM
---Advertisement---

सोमवारी(२ नोव्हेंबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल २०२० च्या ५५ व्या सामन्यात ६ विकेट्सने पराभूत केले. या सामन्यात बेंगलोरचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने एका सुरेख चेंडूवर दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉला त्रिफळाचीत केले. बेंगलोर सामना पराभूत झालेला असतानाही सामन्यानंतरही सिराजने टाकलेल्या या घातक चेंडूची बरीच चर्चा झाली.

असे केले सिराजने शॉला क्लिन बोल्ड – 

या सामन्यात बेंगलोर संघाने दिल्लीला २० षटकात विजयासाठी १५३ धावांचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दिल्लीकडून शिखर धवन आणि शॉ सलामीला फलंदाजीसाठी आले. यावेळी दुसऱ्या षटकात सिराज गोलंदाजीसाठी आला. त्याने या षटकाच्या ५ वा चेंडू योग्य लाईन आणि लेंथने टाकत शॉला बुचकाळ्यात पाडले. हा चेंडू शॉची बॅट चूकवून थेट मधल्या स्टंपला लागला आणि शॉ बाद झाला. या विकेटचा व्हिडिओ आयपीएलच्या अधिकृत वेबसाईटवर शेअर करण्यात आला आहे.

शॉचा खराब फॉर्म कायम –

शॉने या सामन्यात २ चौकार मारत चांगली सुरुवात केली होती. मात्र, सिराजच्या घातक चेंडूचे त्याच्याकडे कोणतेही उत्तर नव्हते. त्यामुळे तो ६ चेंडूत ९ धावा करुन बाद झाला. यंदाच्या आयपीएल हंगामात पॉवरप्लेच्या षटकांमध्ये बाद होण्याची शॉची ही ९ वी वेळ होती. त्यामुळे या हंगामात तो सर्वाधिकवेळा पॉवरप्लेच्या षटकांमध्ये बाद होणारा फलंदाज ठरला आहे.

एवढेच नाही तर मागील सहा सामन्यात पृथ्वी शॉला फक्त एकदाच दुहेरी धावसंख्या गाठण्यात यश आले आहे. त्याने मागील ६ सामन्यात ४,०,०,७,१० आणि ९ अशा धावा केल्या आहेत. तसेच या आयपीएल हंगामात शॉला १२ सामन्यात केवळ २२८ धावा करता आल्या आहेत. त्यामुळे सध्या त्याच्या फॉर्मबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

‘बेंगलोरमध्ये जिंकण्याची क्षमता नाही’, इंग्लंडच्या दिग्गजाचे रोखठोक मत

…म्हणून सूर्यकुमारची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी झाली नाही निवड, भारतीय संघाच्या प्रशिक्षकाचा खुलासा

आयपीएलमध्ये बेकायदेशीर जाहिरात करणाऱ्या आठ दारूच्या ब्रँडवर गुन्हा दाखल

ट्रेंडिंग लेख –

विरेंद्र सेहवागची ‘ती’ शतकी खेळी कोणताही क्रिकेट चाहता विसरू शकत नाही!

वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?

…आणि रोहितचा रो’हिट’ झाला!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---