पुणे – भारताच्या द्वितीय मानांकित सुकांत कदम याने टोकियो, जपान येथे सुरू असलेल्या जागतिक पॅरा वर्ल्ड बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. सुकांतने कोरियाच्या शिन क्युंग ह्वान (कोरिया) याचा २१-१५, २१-१५ असा पराभव केला. पुणे स्थित सुकांत यापूर्वी शिनकडून २०१९ पॅरा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पराभूत झाला होता. या पराभवाचा वचपा काढून सुकांतने या वेळी जागतिक स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला. सुकांतने आजची लढत अवघ्या २८ मिनिटांत जिंकली. त्याने शिनला प्रतिकाराची फारशी संधीच मिळू दिली नाही.
सुकांत कदम (Sukant Kadam) चा कारकिर्दीतील शिनविरुद्ध मिळविलेला हा दुसरा विजय ठरला. आता दोघांनी एकमेकंविरुद्ध प्रत्येकी दोन विजय मिळविले आहेत. उपांत्यपूर्व फेरीत सुकांतची गाठ कोरियाच्या हिओंग आंगशी पडणार आहे. “तो (ह्युंग) चांगला खेळाडू आहे. आजची लढतही चुरशीची झाली. त्याने चांगला प्रतिकार केला. या विजयाने मला पुढील प्रवासात आत्मविश्वास मिळाला,” असे सुकांतने सांगितले.
तत्पूर्वी, सुकांतने ब गटात अव्वल स्थान मिळवून आणि हसन मुबिरू (युगांडा) २१-२, २१-४ आणि व्हॅन थुओंग गुयेन (व्हिएतनाम) यांचा २१-९, २१-१० असा पराभव करून मुख्य फेरीत प्रवेश मिळविला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बापरे! पाकिस्तानच्या खेळाडूंना आयसीसीच्या नियमांचा विसर, चेंडू बॅटला लागला तरी एलबीडब्ल्यूसाठी…
पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांच्यावर गोळीबार, रुग्णालयात दाखल