जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असणाऱ्या सुकांत कदम याने थायलंड पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरीत सुवर्णपदकाची कमाई केली. एकेरीत त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
जाकार्ता येथे झालेल्या या स्पर्धेत एसएल 4 गटातील एकेरीच्या अंतिम लढतीत सुकांत कदम (Sukant Kadam)याला द्वितीय मानांकित आणि पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेत्या फ्रान्सच्या लुकास मझूरकडून 2-21, 17-21 असा पराभव पत्करावा लागला. एकेरीत सुकांतची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. मझूरविरुद्ध तो नववी लढत हरला. सुकांत त्याच्याविरुद्ध एकच लढत जिंकू शकला आहे.
त्यानंतर भारताचा टोकियो पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेत्या प्रमोद भगत (Pramod Bhagat) याच्या साथीत सुकांतने दुहेरीत सुवर्णपदक मिळविले. सुकांत-प्रमोद जोडीने द्वितीय मानांकित ड्वियोको-फ्रेडी सेटिवान जोडीचा 29 मिनिटांत 21-18, 21-13 असा पराभव केला. कारकिर्दीमधील सुकांतचे दुहेरीतील दुसरे विजेतेपद ठरले. यापूर्वी त्याने 2018 मध्ये युगांडा येथील स्पर्धेत विक्रम कुमारच्या साथीत विजेतेपद मिळविले होते.
“पुनरगमनानंतर मिळालेल्या यशावर मी निश्चित समाधानी आहे. अंतिम फेरीत पराभूत होणे नेहमीच निराशाजनक असते. लुकास तगडा प्रतिस्पर्धी आहे. एका दर्जेदार खेळाडूकडून मी हरलो,” असे सुकांत म्हणाला.
Won Gold and Silver medal in Thailand Para Badmintion International 2022. Next is World Championship in Tokyo Japan.#DreamOfParis🗼 #SukantKadam #Paris2024 #ParaBadminton #TeamIndia #Badminton pic.twitter.com/p3amDZmwK3
— Sukant Kadam (@sukant9993) August 20, 2022
“थायलंड स्पर्धेतील ही माझी सर्वोत्तम कामगिरी ठरली. एकेरीत उपविजेतेपद आणि दुहेरीत विजेतेपद आनंद देणारे आहे. प्रमोदबरोबर खेळण्याचा वेगळाच आनंद असतो. तो अनुभवी आणि जिद्दी आहे. त्याच्याबरोबर खेळताना आज लय गवसली आणि स्पर्धेची विजयी अखेर केली,” असेही तो म्हणाला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO। चालू सामन्यात असं काही घडलं की इशान किशनने थेट अक्षर पटेलच्या डोक्यात बॉल मारला
अखेर श्रीलंकेनं जाहिर केला आशिया चषकाचा संघ, अनेक दिवसांनी मैदानावर होणार मलिंगाचं दर्शन
VIDEO। ‘आलिशान व्हिला, चमचमता स्विमिंग पूल’ हार्दिक पंड्याची लग्जरी लाईफस्टाईल पाहिलीत का?