भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज सूर्यकुमार यादव हा सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. खासकरून टी20 क्रिकेटमध्ये त्याने आपली वेगळी छाप पाडलेली दिसून येते. तो सध्या आंतरराष्ट्रीय टी20 फलंदाजी क्रमवारीत पहिल्या स्थानी आहे. त्याच्या याच सातत्यपूर्ण कामगिरीनंतर मुंबईचे माजी प्रशिक्षक राहिलेल्या सुलक्षण कुलकर्णी यांनी त्याची तुलना थेट भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांच्याशी केली.
अवघ्या दोन वर्षाच्या कालावधीत सूर्यकुमार भारतीय संघाचा टी20 क्रिकेटमधील प्रमुख फलंदाज बनला आहे. सूर्यकुमार देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईसाठी खेळतो. मुंबईसाठी त्याचे पहिले प्रशिक्षक राहिलेल्या सुलक्षण कुलकर्णी यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी त्याचे कौतुक केले. ते म्हणाले,
“मला सर्वप्रथम दिलीप वेंगसरकर यांनी सूर्यकुमार याच्याबाबत सांगितले होते. मुंबई अंडर-22 साठी खेळताना मी त्याला पहिल्यांदाच पाहिले. 2011 मध्ये ज्यावेळी मी मुंबईचा प्रशिक्षक झालो, त्यावेळी सर्वांना सांगितले की सूर्याला मुक्तपणे खेळू द्यायला हवे. तो जसा खेळेल तसे खेळू द्या.”
कुलकर्णी पुढे म्हणाले,
“मी त्याला त्यावेळी तसे खेळण्यास सांगितले कारण मला त्याच्यामध्ये कपिल देव यांची झलक दिसली. कारण, ते जेव्हा आपल्या पूर्ण लयीमध्ये असायचे तेव्हा ते सर्वोत्तम वाटायचे. सूर्या देखील तसाच खेळावा असे मला वाटत होते.”
सूर्यकुमार टी20 क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकाचा फलंदाज असला तरी, वनडे क्रिकेटमध्ये त्याला अद्याप आपली छाप सोडता आली नाही. न्यूझीलंड आणि श्रीलंकेविरुद्ध त्याला वनडे क्रिकेटमध्ये यश मिळाले नव्हते. तसेच सध्या त्याचा कसोटी संघात समावेश केला गेला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत तो कसोटी पदार्पण देखील करू शकतो.
(Sulkshan Kulkarni Compared Suryakumar Yadav With Kapil Dev)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हरमन-स्मृतीसह ‘या’ 24 जणी उतरणार सर्वोच्च बेस प्राईसने WPL लिलावात, 409 खेळाडूंची अंतिम यादी जाहीर
पाकिस्तानमध्ये पुन्हा फिक्सिंग! आफ्रिदीवर दोन वर्षांच्या निलंबनाची कारवाई