---Advertisement---

टेनिसपटू सुमीत नागलने रचला इतिहास; गेल्या ७ वर्षात ‘असा’ पराक्रम करणारा बनला पहिलाच भारतीय

On: बुधवार, सप्टेंबर 2, 2020 10:07 PM
---Advertisement---

३१ ऑगस्टपासून अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या ग्रँड स्लॅम स्पर्धेत मंगळवारी भारताच्या सुमीत नागलने त्याच्या कारकिर्दीतील पहिला ग्रँड स्लॅम विजय मिळवला आहे. त्याने पहिल्या फेरीत ब्रॅडली क्लानला ६-१,६-३,३-६,६-१ अशा फरकाने पराभूत केले आणि दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.

सुमीतच्या या विजयामुळे त्याने खास विक्रम केला आहे. तो २०१३ नंतर ग्रँड स्लॅम स्पर्धेत पुरुष एकेरी गटातील दुसऱ्या फेरीत पोहचणारा पहिला भारतीय टेनिसपटू ठरला आहे. त्याच्याआधी सोमदेव देववर्मन ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन आणि अमेरिकन ओपनमध्ये दुसऱ्या फेरीत पोहचला होता.

या विजयानंतर सुमीतचे देशभरात कौतुक होत आहे. त्यानेही या विजयाबद्दल ट्विटरवरुन आनंद व्यक्त केला आहे. त्याने ट्विट केले की ‘माझा ग्रँड स्लॅममधील पहिला विजय. माझ्यासाठी हा नक्कीच खास क्षण होता आणि मी हा सामना कधीही विसरणार नाही. सर्वांनी मला दिलेल्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद. पुढचा सामना गुरुवारी होत आहे. तो सामनाही मजेदार असेल. माझ्या टीमलाही धन्यवाद.’

या सामन्यात सुमीतने सुरुवातीला ब्रॅडलीवर पूर्ण वर्चस्व ठेवले होते. पण तिसऱ्या सेटमध्ये ब्रॅडलीने पुनरामन केले होते. मात्र त्यानंतर चौथ्या सेटमध्ये पुन्हा सुमीतने त्याची लय मिळवत ब्रॅडलीला कोणतीही संधी न देता सेट जिंकत सामनाही खिशात घातला.

आता या स्पर्धेत सुमीत समोर दुसऱ्या फेरीत दुसऱ्या मानांकित ऑस्ट्रेयाच्या डॉमनिक थीमचे आव्हान असणार आहे. हा सामना ३ सप्टेंबरला होईल. थीमचा पहिल्या फेरीतील सामना जौम म्यूनरविरुद्ध झाला होता. पण म्यूनर हा सामना पूर्ण करु शकला नाही. त्याने दुखापतीमुळे सामना अर्धवट सोडल्याने थीमने दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

सुमीत याआधी मागीलवर्षी अमेरिकन ओपन स्पर्धेवेळीच प्रकाशझोतात आला होता. त्यावेळी त्याचा पहिलाच सामना स्विझर्लंडच्या दिग्गज रॉजर फेडररशी झाला होता. त्यावेळी सुमीतने पहिला सेट जिंकला होता. पण नंतर फेडररने पुनरागमन करत पुढचे सलग ३ सेट जिंकून विजय मिळवला होता.

महत्त्वाच्या बातम्या –

सौरव गांगुलीला कठिण काळात प्रणव मुखर्जींनी दिले होते समर्थन; म्हणाले होते…

किंग्स इलेव्हन पंजाबचा धुरंदर म्हणतोय, आयपीएलमध्ये न खेळण्यापेक्षा नियमांचे पालन करणे बरे

१२.५कोटी रुपयांना संघात विकत घेतलेल्या खेळाडूविषयी वाटतेय राजस्थान रॉयल्सला चिंता, कारण घ्या जाणून

ट्रेंडिंग लेख –

तिशीतच आयर्लंडचा दिग्गज झालेला पॉल स्टर्लिंग

काय तर, बेल्स हरवल्यामुळे सामना सुरु झाला नाही!

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १५: शंभर कसोटी सामन्यांच्या उंबरठ्यावर असणारा इशांत शर्मा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---