---Advertisement---

द्रविडच्या नियुक्तीनंतर भारतीय दिग्गज झाला आनंदित; ‘या’ शब्दात केले कौतुक

On: गुरूवार, नोव्हेंबर 4, 2021 9:58 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ युएई येथे टी२० विश्वचषक स्पर्धेत खेळत असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारताच्या पुढील मुख्य प्रशिक्षकाच्या नावाची घोषणा केली आहे. विद्यमान मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या जागेवर भारताचे माजी कर्णधार व सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (एनसीए) संचालकपद सांभाळणारे राहुल द्रविड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. द्रविड यांच्या नियुक्तीनंतर भारताचे सर्वकालीन महान सलामीवीर व समालोचक सुनील गावसकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गावसकर यांनी दिली प्रतिक्रिया
द्रविड यांच्या नियुक्तीनंतर आनंदी झालेल्या गावसकर यांनी एका मुलाखतीत बोलताना म्हटले,
“द्रविड हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपला अपार अनुभव घेऊन संघाचे मिळतील. ते एक उत्कृष्ट रणनीतीकार आहेत. ते खेळत असताना त्यांची कार्यशैली अप्रतिम होती. त्याच गोष्टीचा भारतीय संघाला फायदा होईल.”
द्रविड यांच्या नियुक्तीनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली, बीसीसीआय सचिव जय शहा, भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा यांनी प्रतिक्रिया देत त्यांचे स्वागत केले आहे. स्वत: द्रविड यांनी आपण ही संधी मिळाल्याने सन्मानित झालो असल्याचे म्हटले.

प्रशिक्षक म्हणून शानदार कामगिरी
राहुल द्रविड हे मागील सात वर्षांपासून भारत अ, भारतीय एकोणीस वर्षाखालील संघ व राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक अशा विविध पदांवर कार्यरत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक युवा खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली भारताच्या युवा संघाने २०१८ सालचा एकोणीस वर्षाखालील मुलांचा विश्वचषक जिंकला होता. यावर्षी श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या द्वितीय श्रेणीच्या भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले होते. त्यानंतरच, ते भारताचे पुढील मुख्य प्रशिक्षक असतील, अशी शक्यता वर्तवली जात होती.

महत्त्वाच्या बातम्या-

द वॉल.! कसोटीमधील ‘हे’ तीन रेकॉर्ड राहुल द्रविडची शान अधिक वाढवतात

‘विराट कोहलीला आमच्या ड्रेसिंग रुममध्ये बघायला आवडेल’, स्कॉटलंडच्या कर्णधाराने व्यक्त केली इच्छा

‘हा’ देश ठरू शकतो भारत-पाक कसोटी मालिकेसाठी आदर्श ठिकाण; चाहते करतात तोबा गर्दी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---