भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना सिडनी येथे खेळवला जात आहे. रोहित शर्मा या सामन्यात खेळत नसून त्यानेच विश्रांतीसाठी सांगितले असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, रोहित ज्याप्रकारे खराब फॉर्ममधून जात आहे. ते पाहता त्याला वगळण्यात आले असावे. असे वाटते. आता रोहितसाठी कसोटी संघाचे दरवाजे बंद झाले आहेत. असे अनेक क्रिकेट तज्ज्ञांचे मत आहे. दिग्गज सुनील गावस्कर यांचाही असाच काहीसा विश्वास आहे. ज्यांनी रोहित शेवटची कसोटी खेळल्याचेही सांगितले आहे. रोहितने पाचव्या सामन्यातून विश्रांती घेण्याचा घेतलेला निर्णय पाहता त्याने हा दावा केला आहे.
सुनील गावस्कर मानतात की भारताची WTC फायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता फारच कमी आहे. अश्या स्थितीत सध्या कोणतीही घरच्या मैदानावर कसोटी नाही. ज्यामुळे आता भारतीय संघ रोहित शर्माला सोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करेल.
सिडनी कसोटीच्या पहिल्या दिवशी लंच ब्रेक दरम्यान, स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सुनील गावस्कर म्हणाले, “मला वाटतं की जर भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी पात्र ठरला नाही तर मेलबर्न टेस्ट मॅच रोहित शर्माच्या कारकिर्दीतील शेवटची ठरेल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं नवीन आवर्तन इंग्लंडच्या सीरिजपासून सुरू होईल. त्यामुळे बीसीसीआय आता 2027 च्या WTC फायनलपर्यंत कोण उपलब्ध असेल त्या खेळाडूंचे विचार करेल. भारत अंतिम फेरीत पोहोचेल की नाही हा वेगळा मुद्दा आहे पण मला वाटते की निवड समिती असेच करेल म्हणून कदाचित आपण रोहित शर्माला कसोटी क्रिकेटमध्ये शेवटचे मेलबर्नमध्ये पाहिले आहे”.
रोहितला विश्रांती देण्याच्या निर्णयात निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांचीही महत्त्वाची भूमिका असावी. असे ही ते म्हणाले.
हेही वाचा-
दुधातील माशी प्रमाणे रोहितला बाहेर काढले, यादीत राखीव खेळाडू म्हणूनही नाव नाही
IND VS AUS; सिडनी कसोटीत भारतीय संघाचा टॉप ऑर्डर पुन्हा फ्लॉप!
वारंवार तेच.! विराट कोहलीची पुन्हा तीच चुकी, सिडनी कसोटीच्या पहिल्या डावातही फ्लाॅप