टी-20 विश्वचषक 2022 मधील त्यांच्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानला पराभूत खेले. भारतीय संघाने या सामन्यात शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. या दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघांमधील सामन्याचा थरार चाहत्यांनी चांगलाच लुटला. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर हा सामना पाहण्यासाठी 90,000 हजार प्रेक्षक उपस्थित असल्याचे सांगितले गेले आहे. पण या सर्वांमधून भारतीय संघाचे माजी दिग्गज सुनील गावसकर यांचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
सुनील गावसकर (Sunil Gavaskar) भारतीय संघाचे माजी दिग्गज कर्णधार आहेत. सध्या गावसकर समालोचकाची भूमिका पार पाडताना दिसतात. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या सामन्यादरम्यान देखील गावसकर मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर उपस्थित होते. रविंचंद्रन अश्विनने शेवटच्या चेंडूवर एक धाव घेऊन संघाला विजय मिळवून दिला, तेव्हा गावसकरांची रिएक्शन पाहण्यासारखी होती. यावेळी त्यांच्यासोबत भारताचा माजी अष्टपैलू इरफान पठाण आणि दिग्गज के श्रीकांत देखील उपस्थित होते.
श्रीकांत एका हातात बॅग पकडून विजयाचा जल्लोष करताना दिसले, तर इरफान उपस्थितांच्या हातात हात देऊन आनंद लुटत होता. क्रीडा समालोचक जतीन सप्रू देखील यावेळी उपस्थित होता. या सर्वामध्ये सर्वाचे लक्ष वेधले ते, म्हणजे गावसकरांनी. मजी दिग्गज कर्णधार भारताच्या विजयानंतर एखाद्या लहान मुलासारखा उड्या मारताना दिसल्यामुळे चाहत्यांना देखील आश्चर्य व्यक्त केले. हा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. त्यांचा हा डान्स पाहून भारतीय संघासाठी पाकिस्ताविरुद्धचा हा विजय किती महत्वाचा होता, हे समजू शकते.
The celebration from Sunil Gavaskar says all about the victory. https://t.co/extYFPA4au
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 23, 2022
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारताने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 8 विकेट्सच्या नुकसानावर 159 धावा केल्या. इफ्तिखार अहमद (51) आणि शान मसून (52) या दोघांनी वैयक्तिक अर्धशतके कुटली. भारतासाठी अर्शदीप सिंग आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी भारतीय फलंदाज मैदानात आल्यानंतर सुरुवातीच्या विकेट्स झटपट गेल्या. पण नंतर विराट कोहली आणि हार्दिक पंड्याने मोठी खेळी करत संघाला विजयापर्यंत पोहोचवले. विराटने नाबाद 82, तर हार्दिकने 40 धावांची खेळी केली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘भाऊ मस्त खेळला!’, विराटच्या कौतुकात सूर्यकुमार यादवचे हटके ट्वीट चर्चेत
IND vs PAK | खास यादीत पहिल्या चार क्रमांकांवर विराट कोहलीच, रोहित शर्माचा नंबर पाचवा