भारताच्या प्रमुख गोलंदांजांमध्ये वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि फिरकी गोलंदाज आर अश्विन यांचा समावेश आहे. हे दोघे वेगवेगळ्या प्रकारे गोलंदाजी करतात आणि त्यांचा अनुभव पण वेगवेगळा आहे. परंतु भारतीय दिग्गज सुनिल गावसकर यांचे म्हणणे आहे की या दोन गोलंदाजांमध्ये खुप समानता आहे. आर अश्विनने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत कपिल देवचा ४३५ विकेट्सचा विक्रम मोडला आहे. यावर सुद्धा सुनिल गावसकरांनी आपले मत मांडले आहे.
भारताच्या कसोटी इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम अनिल कुंबळे यांच्या नावावर आहे. त्यांनी त्यांच्या कसोटी कारकिर्दीत १३२ सामन्यांत ६१९ विकेट घेतल्या आहेत. आता आर अश्विन दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
सुनिल गावसकर म्हणाले की, “अजून त्याला खूप लांबचा प्रवास करायचा आहे. मी अजून त्याच्या १६० विकेट्सबद्दल बोलत आहे. परंतु तो असे करण्यात सक्षम आहे. कारण तो वेळेबरोबर चांगला होत चालला आहे. तो त्याच्या प्रशंसेनंतर आराम करत नाही.”
बुमराह आणि अश्विनची तुलना करताना ते म्हणाले की, “जसप्रीत बुमराहने अश्विननंतर कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. परंतु तो निश्चित अश्विनसारखाच आहे. तो नेहमीच आपल्या कामगिरीत काहीतरी जोडण्याचा विचार करत असतो, जसे अश्विन सुद्धा करत असतो. दिड वर्षांपुर्वी एक अशी वेळ होती, जेव्हा अश्विन लेग स्पिन टाकण्याचा प्रयत्न करत होता. कारण त्याला त्याच्या गोलंदाजीत विविधता आणायची होती.”
ते पुढे म्हणाले की, “अश्विन प्रयोगांना घाबरत नाही, यामुळे त्याची कधी कधी धुलाई सुद्धा होते. तो काहीतरी वेगळे करुन फलंदाजांच्या डोक्यात शंका निर्माण करतो. तो आणि बुमराह याबाबतीत समान आहेत. ते दोघे सुद्धा आक्रमक गोलंदाजी करतात आणि दोघांनाही विकेट घ्यायच्या असतात. ते सहज मिळणाऱ्या विकेटसाठी जास्त आनंदी होत नाहीत.”
अश्विनने मोहाली कसोटीत ४३५ हून अधिक विकेट्स घेण्याचा आकडा गाठला होता. श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका भारताने २-० ने जिंकली आहे. भारताने श्रीलंकेला क्लीन स्वीप दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
विजयरथावर स्वार रोहित बनणार विराटपेक्षा यशस्वी कर्णधार, क्रिकेट दिग्गजाची मोठी भविष्यवाणी
काय योगायोग आहे! बरोबर १० वर्षांपासून अबाधित असलेला ‘तो’ विक्रम हरमनप्रीत कौरने मोडला
झुलन गोस्वामीने गाठले कपिल देव, क्रिकेटमधील ‘ही’ असाध्य कामगिरी करण्यात महान अष्टपैलूची केली बरोबरी