बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात कुलदीप यादव याला बाहेर बसवले गेले. मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याक कुलदीप यादव भारतासाठी मॅच विनर ठरला होता. पण दुसऱ्या सामन्यात मात्र त्याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसवले गेले. संघ व्यवस्थापन आणि कर्णधाराच्या या निर्णयावर सर्वत्र नाराजी व्यक्त केली जात आहे. अशात भारतीय संघाचे माजी दिग्गज कर्णधार सुनील गावसकर यांची मोठी प्रतिक्रिया देखील समोर आली आहे.
कुलदीप यादव (Kuldeep Yadav) बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात सर्वाधिक विकेट्श घेणारा गोलंदाज ठरला होता. त्याने पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात 5, तर दुसऱ्या डावात 3 विकेट्स घेतल्या होत्या. त्याने या सामन्यात एकूण 113 धावा खर्च करून आठ विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या या उत्कृष्ट प्रदर्शनाच्या जोरावर भारताने 188 धावांनी जिंकला. मात्र, गुरुवारी (22 डिसेंबर) मिरपूरमध्ये सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात कुलदीपला उत्कृष्ट प्रदर्शनानंतर देखील संधी दिली गेली नाही. गुरुवारी सुनील गावसकर (), डोडा गणेश आणि महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णदार अंजुम चोप्रा समालोचकाच्या भूमिकेत होत्या. कुलदीपला संघातून वगळल्यामुळे या तिघांनी देखील नाराजी व्यक्त केली.
चर्चेदरम्यान सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांचे वक्तव्य अनेकांना अश्चर्यचकीत करणारे होते. कुलदीपला प्लेइंग इलेव्हनमधून वगळल्यामुळे गावसकर चांगलेच संतापले होते, पण त्यांनी खूपच कमी शब्दात स्वतःची नाराजी बोलून दाखवली. संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयावर विश्वस ठेवने त्यांच्यासाठी कठीण आहे. गावसकर म्हणाले की, “संघातील सर्वोत्कृष्ट खेळाडूला या सामन्यातून बाहेर बसवणे, अविश्वसनीय आहे. मी फक्त याच शब्दाचा वापर करेल. मला खूप कठोर शब्द वापरायचे आहेत, पण हे खरोखर अविश्वसनीय आहे की, तुम्ही सामन्यातून तुमच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूला बाहेर बसवले आहे.”
भारतीय संघाने या सामन्यात अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन याय दोघा फिरकी गोलंदाजांना संधी दिली. मात्र कुलदीपला संघातून वगळले गेले. गावसकरांच्या मते अश्विन आणि अक्षरपैकी कोणा एकाला बाहेर बसवता आले असते, पण संघ व्यवस्थापनाने तसे केले नाही. “तुमच्याकडे दोन अजून फिरकी गोलंदाज आहेत. नक्कीच या दोघांपैकी कोणा एकाला बाहेर बसवता आले असते. पण हा खेळाडू, ज्याने मागच्या सामन्यात आठ विकेट्स घेतल्या, त्याला खेळवलेच पाहिजे होते. खेळपट्टी देखील त्याच्यासाठी अनुकूल होती.” यावेळी उपस्थित असलेल्या डोडा गणेश आणि अंजुम चोप्रांनी देखील कुलदीपला संघातून बाहेर बसवल्यामुळे नाराजी व्यक्त केली. (Sunil Gavaskar expressed his displeasure over Kuldeep Yadav not being given a chance in the playing XI in the second Test match against Bangladesh)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चलनी नोटांवर शोभणार जगज्जेता मेस्सी? अर्जेंटिना सरकार लवकरच घेऊ शकते निर्णय
“म्हणून मी कर्णधार म्हणून धोनीची शिफारस केली”, 15 वर्षानंतर सचिनने केला खुलासा





