जून महिन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मंगळवारी (25 एप्रिल) या अंतिम सामन्यासाठी भारताचा 15 सदस्यीय संघ घोषित केला. या संघात अजिंक्य रहाणे याचे नाव सामील केल्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला. अशातच आता भारतीय संघाचे माजी दिग्गज कर्णधार सुनील गावसकर यांनी डब्ल्यूटीसी फायनसाठी आपली प्लेइंग इलेव्हन निवडली.
बीसीसीआयने डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यासाठी निवडेलल्या 15 सदस्यीय संघातील 11 खेळाडू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी निवडले आहेत, जे प्रत्यक्षात मैदानात खेळताना दिसतील. गावसकरांनी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये पाच फलंदाज, एक यष्टीरक्षक, दोन अष्टपैलू आणि तीन वेगवान गोलंदाज आहेत. सलामीवीर फलंदाज म्हणून गावसकरांनी शुबमन गिल आणि रोहित शर्मा यांची निवड केली आहे. तसेच मध्यक्रमातील फलंदाजांमध्ये चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांची निवड त्यांनी केली.
केएल राहुल मागच्या मोठ्या काळापासून अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाहीये. पण गावसकरांच्या मते राहुलला डब्लूयीटीच्या अंतिम सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून निवडले गेले पाहिजे. तसेच रविंद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांच्या संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून निवडले गेले पाहिजे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामना 7 ते 11 जूनदरम्यान इंग्लंडच्या केनिंगटन ओव्हल स्टेडियमवर खेळला जाणार आहे. याठिकाणी खेळपट्टी बहुतांश वेळा ग्रीन टॉप असते आणि वेगवान गोलंदाज अनेकदा प्रभावी ठरतात. याच पार्श्वभूमीवर गावसकरांनी वेगवान गोलंदाजांमध्ये जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांना संघात निवडले आहे. (Sunil Gavaskar has selected India’s playing XI for the WTC Final)
डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यासाठी सुनील गावसकरांनी निवडलेली भारताची प्लेइंग इलेव्हन
शुभमन गिल, रोहित शर्मा (कर्णधार), चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, अश्विन, जयदेव उनादकट, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यासाठी निवडेले भारत आणि ऑस्ट्रेलियाचे 15 सदस्यीय संघ –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहोम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनादकट.
ऑस्ट्रेलिया – पैट कमिंस (कर्णधार), स्टीव स्मिथ (उपकर्णधार), एलेक्स केरी, कॅमरून ग्रीन, स्कॉट बोलंड, मार्कस हॅरिस, जोश हजेलवुड, ट्रेविस हेड, जोस इंग्लिश, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नाथन लियान, मिचेल मार्श, टॉड मर्फी, मॅट रेनशॉ, मिचेल स्टार्क, डेविड वार्नर.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नाद करायचा नाय! सिराजच्या वेगापुढे रसेलने टेकले गुडघे, यॉर्कर चेंडू टाकत उडवल्या दांड्या, Video
आरसीबी-केकेआर सामन्याती गेम चेंजिंग मोमेंट! पाहा खोऱ्याने धावा ओढणारा विराट कसा झाला बाद