भारतीय क्रिकेट संघासाठी 2023 हे वर्ष अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण, भारतीय संघाकडे या वर्षभरात दोन महत्त्वाच्या आयसीसी स्पर्धा जिंकण्याची संधी असेल. जून महिन्यात खेळल्या जाणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारतीय संघ खेळताना दिसण्याची दाट शक्यता आहे. तसेच, वनडे विश्वचषक यावर्षी भारतात होत असल्याने भारताकडे तो देखील जिंकण्याची अधिक संधी असेल. याच मुद्द्याला धरून भारताचे सर्वकालीन महान फलंदाज सुनील गावसकर यांनी एक इच्छा व्यक्त केली आहे.
भारतीय संघाकडे नेहमीच मोठ्या स्पर्धांमध्ये संभाव्य विजेता म्हणून पाहिले जाते. मात्र, 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी नंतर भारताने कोणतीही वरिष्ठ स्पर्धा जिंकली नाही. मागील वर्षी टी20 विश्वचषकात भारतीय संघाला उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागलेला. त्यामुळे यावर्षी होत असलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना वनडे विश्वचषकात हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न भारतीय संघ करेल.
भारतीय संघाकडून या दोन्ही स्पर्धा जिंकण्याची अपेक्षा दिग्गज सुनील गावसकर यांनी व्यक्त केली. एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले,
“भारतीय संघ सध्या उत्कृष्ट पद्धतीने क्रिकेट खेळतोय. त्याच कारणाने मला भारताला जागतिक कसोटी चॅम्पियनशिप व वनडे विश्वचषक या दोन्ही स्पर्धा जिंकताना पाहायला आवडेल.”
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील आणखी एक सामना जिंकून भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात सलग दुसऱ्यांदा सहभागी होईल. हा अंतिम सामना 6 जूनपासून ओव्हल येथे खेळण्यात येईल. तर, ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतीय संघ वनडे विश्वचषकाचे यजमानपद भूषवेल. भारतीय संघाने अखेरच्या वेळी 2011 मध्ये वनडे विश्वचषक आपल्या नावे केला होता.
(Sunil Gavaskar Hoping India Will Win World Test Championship And ODI World Cup In 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘म्हणूनच बायको सोडून गेली’, धवन अन् बॉलिवूड अभिनेत्रीच्या ‘त्या’ व्हिडिओवर नेटकऱ्याची लक्षवेधी कमेंट
“सिराजला गोलंदाजीतील विराट व्हायचेय”, माजी प्रशिक्षकांनी सांगितला तो किस्सा