क्रिकेटचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे खेळपट्टी. खेळपट्टीवरून पूर्ण सामन्याचा आढावा घेतला जाऊ शकतो. खेळपट्टीचे सुद्धा वेग वेगळे भाग असता जसे की, हिरवीगार खेळपट्टी, पाटा खेळपट्टी, उसळती खेळपट्टी, धीमी-जलदगती खेळपट्टी इत्यादी. या प्रकारच्या खेळपट्टीवरून सामन्याची परिस्थिती जाणून घेता येते. नुकतेच सुनील गावसकरांनी सांगितले आहे की त्यांच्यासाठी सर्वात कठीण खेळपट्टी कोणती होती.
भारतीय आणि आशियाई देशात जवळपास सगळ्याच खेळपट्ट्या कसोटी सामन्यात फिरकी गोलंदाजीला अनुकूल असतात. त्यामुळे विदेशी संघाना या खेळपट्टीवर खेळणं कठीण जात. भारतात असे खूप कमी खेळपट्ट्या झाल्या की, कसोटी सामन्यात फिरकी ऐवजी जलदगती गोलंदाजांना त्याचा फायदा झाला. असाच एक किस्सा सुनील गावसकर यांनी सांगितला ज्यामध्ये त्यांना त्या खेळपट्टीवर खेळताना जास्त त्रास झाला.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वप्रथम दहा हजार धावा करणारे भारतीय फलंदाज सुनील गावसकर ‘द क्रिकेट एनालिस्ट पोडकास्ट’ मध्ये सांगतात की, ‘१९७८ रोजी वेस्टइंडीज संघाविरुद्ध खेळल्या गेलेल्या चेन्नई कसोटीतील खेळपट्टी आजवर माझ्यासाठी कठीण खेळपट्टी होती. मी वेस्ट इंडीजच्या सबिना पार्क येथे फलंदाजी केली, जिथे चेंडू जोरात डोक्यावरून निघून जातो. मी पर्थच्या खेळपट्टीवर फलंदाजी केली, जिथे चेंडू जोरात अंगावर येतो. परंतु, चेन्नईची ती खेळपट्टी सर्वात त्रासदायक ठरली.’
गावसकर यांचा काळात उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंमध्ये कपिल देव, इम्रान खान, ईयान बॉथम आणि रिचर्ड हेडली यांची नावे जगभर प्रसिद्ध होती. गावसकर यांना जेव्हा सर्वोत्तम खेळाडूबद्दल विचारल्यानंतर त्यांनी वेस्ट इंडीज संघाचे माजी महान क्रिकेटर ‘सर गारफिल्ड सोबर्स’ याचं नाव घेतले. गावस्कर म्हणतात, ‘सोबर्स जलद गतीने फलंदाजी करून संघाला विजय मिळवून देण्यात माहीर होते आणि गोलंदाजी करतानासुद्धा ते तेवढेच आक्रमक होते. तसेच सोबर्स श्रेत्ररक्षणात सुद्धा चपळ होते.’ (Sunil Gavaskar names the hardest pitch he is batted on)
गावस्करांनी आजवर भारतीय संघ साठी १२५ कसोटी सामने खेळले आहेत. त्यांनी कसोटीत ५१.१च्या सरासरीने १०१२२ धावा केल्या आहेत. त्यात त्यांची सर्वोच्च खेळी नाबाद २३६ धावा राहिली. सोबतच त्यांनी ३४ शतक आणि ४५ अर्ध शतक केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
कोहली-रोहित नाही तर ‘या’ भारतीय खेळाडूकडून महिला क्रिकेटपटूंना घेतल्या इंग्लंड दौऱ्यासाठी टिप्स
श्रीलंका दौऱ्यात टीम इंडियाच्या ‘प्लेइंग ११’ मध्ये ‘या’ खेळाडूंना मिळू शकते स्थान