इंडियन प्रीमियर लीग २०२२मध्ये नव्याने सहभागी झालेला गुजरात टायटन्स संघ शानदार प्रदर्शन करत प्लेऑफसाठीचे आपले मार्ग सोपे बनवत आहे. गुजरातकडून फलंदाज शुबमन गिल, गोलंदाज मोहम्मद शमी, कर्णधार हार्दिक पंड्या यांच्यासह भारतीय अष्टपैलू राहुल तेवतिया हादेखील धडाकेबाज खेळ दाखवत आहे. तेवतियाने बऱ्याच सामन्यात गुजरातसाठी मॅच फिनिशरची भूमिका निभावली आहे.
भारताचे महान फलंदाज सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांना वाटते की, तेवतियाने (Rahul Tewatia) शारजाहमध्ये शेल्डन कॉट्रेलला एकाच षटकात मारलेले ५ षटकार त्याचा आत्मविश्वास वाढवून गेले की तो अशाप्रकारे खेळू शकतो. तेवतियाने त्याच्या खेळासह टी२० संघातील त्याचा दावा आणखीन मजबूत केला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
गावसकर ‘स्टार स्पोर्ट्स’शी बोलताना (Sunil Gavaskar Praised Rahul Tewatia) म्हणाले की, “आयपीएल २०२० मध्ये शारजाहमध्ये कॉट्रेलला मारलेल्या षटकारांनी तेवतियाचा आत्मविश्वास वाढवला की, तो अशक्यला शक्य करून दाखवू शकतो. आपण त्याला अशक्य ते शक्य करताना पाहिलेही आहे. डेथ ओव्हर्समध्ये त्याच्या फलंदाजीत आत्मविश्वास स्पष्टपणे दिसून येतो. तो चेंडू येण्याची वाट पाहात असतो आणि आपले आवडते फटके खेळत असतो. त्याच्याजवळ सगळे शॉट आहेत, परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे, संघ अडचणीत असताना त्याचा स्वतवरील ताबा न हरवण्याचा गुण खास आहे.”
तसेच पुढे बोलताना गावसकरांनी तेवतियाला ‘आइस मॅन’ (Ice Man) हे टोपणनाव दिले आहे. ते म्हणाले, “मी त्याला आइस मॅन यासाठी म्हणतो की, तो खेळपट्टीवर असताना थोडासाही घाबरलेला नसतो. तो चेंडूला ओळखतो आणि त्याला माहिती असते की, कोणता फटका केव्हा खेळायचा आहे. त्याने त्याच्या डोक्यात तयारी करून ठेवलेली असते की, चेंडू इथे पडेल आणि त्याला हा फटका खेळायचा आहे आणि तो अशावेळी नेहमी षटकार मारतो. हेच कारण आहे की, तो आइस मॅन आहे. तो परिस्थितीला पाहून घाबरून जात नाही.”
तेवतियाने आयपीएल २०२२ मध्ये १० सामने खेळताना ३८च्या सरासरीने १९० धावा फटकावल्या आहेत. यादरम्यान त्याची सर्वोच्च वैयक्तिक खेळी नाबाद ४४ धावा इतकी राहिली आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
द्रविडची ‘ती’ गोष्ट पाहून सॅमसन झालेला चकीत, फलंदाजी करतानाच्या आठवणीचाही केला खुलासा
Video: हार्दिक पंड्याची विकेट घेताच धवनचा जोरदार जल्लोष, फ्लाईंग किस देत केले सेलिब्रेशन
एसपी गोसावी मेमोरियल पुणे आंतरक्लब टेनिस अजिंक्यपद: इलाईट गटात पीवायसी १ संघाला विजेतेपद