Monday, May 23, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एसपी गोसावी मेमोरियल पुणे आंतरक्लब टेनिस अजिंक्यपद: इलाईट गटात पीवायसी १ संघाला विजेतेपद

एसपी गोसावी मेमोरियल पुणे आंतरक्लब टेनिस अजिंक्यपद: इलाईट गटात पीवायसी १ संघाला विजेतेपद

May 4, 2022
in टेनिस
Winner-Team-PYC-1-with-chief-guest

Photo Courtesy: File Photo


पुणे। पीवायसी हिंदू जिमखाना आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या वतीने एसपी गोसावी मेमोरियल पुणे आंतरक्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम फेरीत पीवायसी 1 संघाने पीवायसी 2 संघाचा 24-14 असा पराभव करत विजेतेपद संपादन केले.

पीवायसी हिंदू जिमखाना येथील टेनिस कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीच्या लढतीत 100 अधिक गटात पीवायसी 1 संघाच्या राधिका कानिटकर व जयंत कढे यांनी पीवायसी 2 संघाच्या प्रशांत गोसावी व सुंदर अय्यर यांचा 6-2 असा तर, 90अधिक गटात पीवायसी 1 संघाच्या डॉ.अभय जमेनीस व ऋतू कुलकर्णी यांनी राहुल मुथा व योगेश पंतसचिव यांचा टायब्रेकदमध्ये 6-5(3) असा पराभव करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. खुल्या गटात पीवायसी 1 संघाच्या अभिषेक ताम्हाणेने केतन धुमाळच्या साथीत रोहित शिंदे व नरहर गर्गे यांचा 6-3 असा तर, दुसऱ्या खुल्या गटाच्या लढतीत पीवायसी 1 संघाच्या जयंत कढे व अनुप मिंडा या जोडीने प्रशांत गोसावी व अमोघ बेहेरे यांचा 6-4 असा पराभव करून संघाला सहज विजय मिळवून दिला.

स्पर्धेतील विजेत्या पीवायसी 1 संघाला एसपी गोसावी स्मृतीकरंडक प्रदान करण्यात आला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, क्लबचे मानद सचिव सारंग लागू, एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, तनया गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीएमडीटीएचे मानद सचिव अभिषेक ताम्हाणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

निकाल: अंतिम फेरी:
पीवायसी 1 वि.वि.पीवायसी 2 24-14(100अधिक गट: राधिका कानिटकर/जयंत कढे वि.वि.प्रशांत गोसावी/सुंदर अय्यर 6-2; 90अधिक गट: डॉ.अभय जमेनीस/ऋतू कुलकर्णी वि.वि.राहुल मुथा/योगेश पंतसचिव 6-5(3); खुला गट: अभिषेक ताम्हाणे/केतन धुमाळ वि.वि.रोहित शिंदे/नरहर गर्गे 6-3; खुला गट: जयंत कढे/अनुप मिंडा वि.वि.प्रशांत गोसावी/अमोघ बेहेरे 6-4); उत्कृष्ट खेळाडू: अभय जमेनीस.

महत्त्वाच्या बातम्या – 

एसपी गोसावी मेमोरियल पुणे आंतरक्लब टेनिस अजिंक्यपद: पीवायसी १ व पीवायसी २ यांच्यात विजेतेपदासाठी लढत

बाबा रॉड्रिक्स अँड सन्स आयटीएफ एस२०० वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत देशभरातून २००हून अधिक खेळाडू सहभागी

द्रविडची ‘ती’ गोष्ट पाहून सॅमसन झालेला चकीत, फलंदाजी करतानाच्या आठवणीचाही केला खुलासा


ADVERTISEMENT
Next Post
Rahul-Tewatia

गुजरात टायटन्सच्या मॅच फिनिशर तेवतियाचा फॅन बनले महान फलंदाज गावसकर, म्हटले 'आइस मॅन'

Wriddhiman-Saha

मोठी बातमी! साहाला धमकावणे पडले महागात, बीसीसीआयने केली मोठी कारवाई

Photo Courtesy: Facebook/RolandGarros

बाबा रॉड्रिक्स अँड सन्स आयटीएफ एस२०० वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद: आठ मानांकित खेळाडूंचे आव्हान संपुष्टात

Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.