---Advertisement---

IND vs AUS; विराटने कशामुळे झळकावले शानदार शतक? गावसकरांचे मोठे वक्तव्य

On: बुधवार, नोव्हेंबर 27, 2024 8:40 PM
---Advertisement---

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील बाॅर्डर गावसकर मालिकेतील पहिला कसोटी सामना पर्थच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) नेतृत्वाखालील भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवत 1-0 अशी आघाडी घेतली. याच सामन्यात भारताचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीने (Virat Kohli) शानदार शतक झळकावले होते. त्यामागील कारण काय? याबद्दल आता सुनील गावसकरांनी (Sunil Gavaskar) मोठे वक्तव्य केले आहे.

कोहलीला काही काळ सर्व फॉरमॅटमध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. फिरकीपटूंना अनुकूल अशा विकेट्सवर तो संघर्ष करताना दिसला. यानंतर त्याच्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. पण ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात त्याने नाबाद शतक झळकावून सर्व प्रश्नांचे उत्तर दिले. यापूर्वी कोहलीने जुलै 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरूद्ध शेवटचे शतक झळकावले होते.

सुनील गावसकर यांनी स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सांगितले की, “जेव्हा तो दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आला तेव्हा तो खूपच आरामदायक दिसत होता. भारताने पहिल्या डावात 2 गडी लवकर गमावले होते आणि इतर खेळाडूंप्रमाणे तोही दडपणाखाली होता. दुसऱ्या डावात भूमिका बदलण्याबरोबरच त्याने आपल्या पायांवर देखील चांगलाच जम बसवला होता. माझ्या मते छोट्या छोट्या गोष्टींशी जुळवून घेतल्याने त्याला हव्या त्या स्थितीत पोहोचण्यास मदत झाली. ऑस्ट्रेलियाच्या उसळत्या खेळपट्ट्यांवर अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे.”

सुनील गावसकर म्हणाले, “कॉमेंट्री करताना मी म्हणालो होतो की, जर रॉजर फेडरर, नोव्हाक जोकोविच आणि राफा नदालसारखे चॅम्पियन खेळाडू उपांत्य फेरीत हरले तर लोक म्हणतात की ते फॉर्ममध्ये नव्हते. दुसऱ्याने उपांत्य फेरी गाठली तर किती छान कामगिरी केली असे म्हणतात.”

गावसकर म्हणाले, “हीच गोष्ट विराट कोहलीला लागू होते कारण लोक त्याच्याकडून शतकाची अपेक्षा करतात. त्याने 70 किंवा 80 धावा केल्या तरी लोक म्हणतील बघ, तो धावा करू शकत नाही. भारतीय चाहते लोभी आहेत. आपल्या स्टार खेळाडूने 70 किंवा 80 धावा केल्याने ते खूश होत नाहीत.”

महत्त्वाच्या बातम्या-

IPL 2025; सर्वात खतरनाक दिल्ली कॅपिटल्सची प्लेइंग इलेव्हन?
IND vs AUS; ऑस्ट्रेलिया संघात पडली फूट? स्टार खेळाडूच्या वक्तव्यानं उडाली खळबळ
चांगल्या कामगिरीचं बक्षीस मिळालं! आयसीसी रँकिंगमध्ये कोहली-जयस्वालची मोठी झेप

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---