भारतीय संघ आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी प्रबळ दावेदार असल्याचे बोलले जात आहे. अष्टपैलू अक्षर पटेल दुखापतग्रस्त झाल्यामुळे वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतून बाहेर पडला. त्यामुळे त्याच्या जागी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याला भारतीय संघात निवडले गेले आहे. त्याला निवडल्यानंतर सुरू झालेल्या चर्चांवर माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
अश्विन विश्वचषकात भारतासाठी ट्रम्पकार्ड ठरू शकतो, असे गावसकर म्हणाले. प्रसारण वाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, “विश्वचषकात सामने मधल्या षटकांत ठरतील. आपण पाहिले आहे की, खेळपट्टी किती चांगली होती आणि कोणताही टर्न आणि बाउन्स नसताना खेळाडू सहजतेने खेळत होते. ईथेच अश्विनला त्याच्या अनुभवाचा आणि हुशारीचा पुरेपूर फायदा घेता येईल.”
ते पुढे म्हणाले की, “विश्वचषकाच्या मोठ्या सामन्यांमध्ये तो प्लेइंग 11 चा भाग असेल की नाही हे मला माहीत नाही. मात्र, तो असा गोलंदाज आहे जो तुम्हाला मधल्या षटकांमध्ये बळी मिळवून देऊ शकतो. तो भागीदारी होऊ देणार नाही आणि विरोधी संघाला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखू शकतो.”
अश्विन आपल्या कारकिर्दीत तिसऱ्यांदा वनडे विश्वचषक खेळेल. 2011 मध्ये त्याने प्रथम वनडे विश्वचषकात सहभाग घेतलेला. त्यावेळी भारतीय संघ विजेता ठरलेला. त्यानंतर 2015 विश्वचषकात देखील तो भारतीय संघाचा भाग राहिलेला. मागील विश्वचषकात जागा मिळवण्यात त्याला अपयश आलेले.
विश्वचषकासाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, ईशान किशन, सूर्यकुमार यादव.
(Sunil Gavaskar Said Ravichandran Ashwin Is Our Trump Card In ODI World Cup 2023)
हेही वाचा-
World Cup Countdown: वर्ल्डकप ट्रॉफी उंचावण्याची हॅट्रिक करणारी ऑस्ट्रेलिया
सराव सामन्यात भारत आणि इंग्लंड आमने-सामने, टॉस जिंकून रोहितने घेतली बॅटिंग; पाहा संघ