भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफी गुरुवारी (9 फेब्रुवारी) सुरू होत आहे. मालिका सुरू होण्याच्या काही दिवस आधी ऑस्ट्रेलियन संघ भारतात दाखल झाला आणि त्यांनी सरावाला सुरूवात देखील केली. उभय संघांतील ही मालिका पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत, पण ऑस्ट्रेलियन संघाकडून मात्र वारंवार खेळपट्टीविषयी तक्रार केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर भारताचे माजी दिग्गज कर्णधार सुनील गावसकर यांनी ऑस्ट्रेलिया संघ आणि त्यांच्या माजी खेळाडूंना प्रत्युत्तर दिले.
ऑस्ट्रेलियन खेळपट्टी वेगवान गोलंदाजांच्या तुलनेत फिरकी गोलंदाजांसाठी जास्त फायदेशीर असते. दुसरीकडे ऑस्ट्रेलियातील केळपट्टी मात्र फिरकी गोलंदाजांच्या तुलनेत वेगवान गोलंदाजांसाठी अधिक अनुकूल असते. भारतीय संघासोबत कसोटी मालिका खेळताना यापूर्वीही ऑस्ट्रेलियन संघाने खेळपट्टीविषयी तक्रारी केल्या आहेत. यावेळीही मालिका सुरू होण्याआधीच ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी तक्रारींचा वाढा सुरू केला आहे. ऑस्ट्रेलियन मीडियाने देखील हा मुद्दा उचलून धरला आहे. अशात माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी भारतीय संघाची बाजू सर्वांसमोर मांडत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले.
सुनील गावसकर यांनी मीड-डे मधील त्यांच्या कॅलममध्ये या विषयावर सविस्तर मत मांडले. त्यांनी लिहिले की, “ऑस्ट्रेलियन संघाने माइंड गेम खेळायला सुरुवा केली आहे. मागच्या वेळी भारताने कशाप्रकारच्या खेळपट्टी बनवल्या होत्या, यावर ते बोलत आहेत. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ब्रिसबेनमध्ये खेळला गेलेला कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने दोन दिवसांमध्येच संपवला.”
“मुद्दा फक्त दोन दिवसात सामना संपण्याचा नाहीये. या सामन्यातील खेळपट्टी कोणत्या पद्धतीने बनवली गेली होती, याचा आहे. चेंडू ज्या प्रकारे इकडे-तिकडे उसळी घेत होता, ते खेळाडूंसाठी जीवघेणे होते आणि त्यांना गंभीर दुखापतही होऊ शकत होती. दुसरीकडे फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टीवर केवळ फलंदाजांची प्रतिष्ठा पणाला लागते, खेळाडूंच्या जीवाला आणि अंगाला यामुळे धोका नसतो,” असेही गावसकरांनी पुढे सांगितले.
दरम्यान, उभय संघांतील पहिला कसोटी सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियवर खेळला जाणार आहे. भारतासाठी सूर्यकुमार यादव या सामन्यातून कसोटी पदार्पण करणार असल्याचे सांगितले जात आहे. (Sunil Gavaskar’s reply to the Australian players criticizing the Indian pitch)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रांची स्टेडियमला पोहोचण्यासाठी धोनीने काढली बाईक, आयपीएलची तयारी जोरात सुरू
“मला त्या दोघांमधील टशन पाहायचे आहे”, भारतीय दिग्गजाने व्यक्त केली इच्छा