आयपीएल फ्रेंचायजी कोलकाता नाईट रायडर्सचा आणि वेस्ट इंडीजचा दिग्गज फिरकी गोलंदाज सुनील नरेनने रोहित शर्माचे तोंड भरून कौतुक केले आहे. रोहित शर्मा भारतीय संघाप्रमाणेच त्याची आयपीएल फ्रेंचायझी मुंबई इंडियन्सचे देखील चांगल्या प्रकारने नेतृत्व करत आला आहे. नरेनच्या मते रोहित जेव्हा फलंदाजी करत असतो तेव्हा त्याला पाहताना खूपच चांगले वाटते. तसेच त्याने धावा करो अगर न करो, तो नेहमीच फॉर्ममध्ये असतो.
रोहित शर्मा (Rohit Sharma) मागच्या वर्षी टी-20 विश्वचषकानंतर क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचे नेतृत्व करू लागला. विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर त्याला ही जबाबदारी सोपवली गेली होती. कर्णधाराच्या रूपात त्याने मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) सोबत चमकदार कामगिरी केली आहे. मुंबईने त्याच्याच नेतृत्वात सर्वाधिक पाच आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर तो आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार देखील ठरतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर अनेक विक्रम असे आहेत, जे मोडणे कोणत्याही दिग्गज फलंदाजासाठी खूप कठीण असेल.
रोहित कधीच खराब फॉर्ममध्ये नसतो – सुनील नरेन
सुनील नरेन (Sunil Narine) पत्रकार विमल कुमार यांच्यासोबत बोलताना रोहितचे कौतुक करताना दिसला. तो म्हणाला की, “रोहित शर्मा एख दर्जेदार खेळाडू आहे. त्याच्या क्षमतेवर कोणालाच शंका नाहीये. जेव्हा तो त्याच्या तयीत असतो, तेव्हा त्याला पाहून चांगले वाटते. तो नेहमीच फॉर्ममध्ये असतो. त्याने धावा करो किंवा न करो, तो खराब फॉर्ममध्ये कधीच नसतो. रोहित एक असा खेळाडू आहे, ज्याला फलंदाजी करताना पाहून मला चांगले वाटते. भारताच्या कर्णधाराच्या रूपात त्याने खूप यश मिळवले आहे आणि आयपीएलमध्येही त्याचे आकडे नक्कीच चांगले आहेत.”
दरम्यान, आयपीएलमध्ये खेळताना सुनील नरेन आणि रोहित सर्मा अनेकदा एकमेकांसमोर आले आहेत. नरेन सध्या वेस्ट इंडीजच्या कॅरेबियन प्रीमियर लीग म्हणजेच सीपीएलमध्ये खेळत आहे. त्याला आगामी टी-20 विश्वचषकासाठी वेस्ट इंडीजच्या संघात सहभागी केले गेले नाहीये. तर दुसरीकडे रोहित शर्मा मात्र टी-20 विश्वचषकात भारताच्या कर्णधाराची भूमिका पार पाडताना दिसेल. तत्पूर्वी भारतीय संघाला मायदेशात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धची टी-20 मालिका खेळायची आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
भारतीय हॉकी क्षेत्रात भूकंप! कर्णधार मनप्रीतवर लावले गेले गंभीर आरोप; वाचा सविस्तर प्रकरण
भारताविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया सज्ज, सरावाला केली सुरुवात
‘बर्थडे बॉय’ निशामने साधला टीम इंडियाच्या स्टार खेळाडूवर निशाणा; म्हणतोय…