---Advertisement---

“केकेआर माझं दुसरं घर”, रिटेन केल्यानंतर सुनील नरेन झाला इमोशनल

On: शुक्रवार, डिसेंबर 3, 2021 12:45 PM
---Advertisement---

येत्या काही महिन्यात आयपीएल २०२२ स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. याच स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सर्व जुन्या संघांना रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यास सांगण्यात आले होते. सर्व संघांनी मंगळवारी (३० नोव्हेंबर) रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये काही युवा खेळाडू कोट्यवधी झाले, तर काही दिग्गज खेळाडूंना संघाबाहेर करण्यात आले आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाने आपला अनुभवी फिरकीपटू सुनील नरेनला संघात कायम ठेवले आहे. अशातच रिटेन केल्यानंतर सुनील नरेनने पाहिली प्रतिक्रीया दिली आहे.

कोलकाता नाईट रायडर्स संघाने दोन वेळेस आयपीएल स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. दोन्ही वेळेस कोलकाता नाईट रायडर्स संघाला जेतेपद मिळवून देण्यात सुनील नरेनने मोलाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे फ्रँचायजीने त्याच्यावरील विश्वास कायम ठेवत त्याला पुढील हंगामासाठी रिटेन केले आहे. त्याला ६ कोटी रुपये खर्च करत रिटेन करण्यात आले आहे.

अशातच रिटेन केल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स फ्रँचायजीने ‘द कमबॅक’ नावाची व्हिडिओ प्रसिध्द केली आहे. ज्यामध्ये सुनील नरेनने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

सुनील नरेनने या व्हिडिओमध्ये म्हटले की, “केकेआर व्यतिरिक्त माझं दुसरं कुठलंच घर नाही. मी माझं संपूर्ण क्रिकेट इथेच खेळलो आहे. मला या फ्रँचायझीसोबत क्रिकेट खेळणं सुरू ठेवायला नक्की आवडेल. हे माझं दुसरं घर आहे. त्यामुळे मला अशी आशा आहे की, मी खेळणे येथेच सुरू ठेऊ शकतो.”

सुनील नरेन आगळ्या-वेगळ्या शैलीने गोलंदाजी करतो. त्यामुळे अनेकदा त्याच्या गोलंदाजी शैलीवर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केले गेले आहे. २०२० मध्ये देखील त्याच्या गोलंदाजी शैलीमुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती.

याबाबत बोलताना तो म्हणाला की, “तो खूप कठीण काळ होता. शेवटी क्रिकेट माझ्यासाठी कधीच सोपे नव्हते. माझ्याकडे आता जे काही आहे, ते मिळवण्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागली आहे. हे एक असे पाऊल होते, जिथे मला जास्त मेहनत करून पुन्हा एकदा वर यायचे होते.”

https://twitter.com/KKRiders/status/1466055423543300102?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1466055423543300102%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fd-16314707442825633260.ampproject.net%2F2111152338002%2Fframe.html

https://twitter.com/KKRiders/status/1466345147495436295?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1466345147495436295%7Ctwgr%5Ehb_1_7%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fd-16314707442825633260.ampproject.net%2F2111152338002%2Fframe.html

तसेच कोलकाता नाईट रायडर्स संघाने सुनील नरेनसह व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसल आणि वरूण चक्रवर्तीला रिटेन केले आहे. तसेच ओएन मॉर्गन, दिनेश कार्तिक या दिग्गज खेळाडूंना कोलकाता नाईट रायडर्स संघाने रिलीज केले आहे. इतकेच नव्हे तर चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या शुबमन गिलला देखील त्यांना रिलीज केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

व्वा, काय योग आलाय! भारतीय वंशाचा किवी गोलंदाज जन्मस्थळी खेळणार कसोटी, यापूर्वी ‘या’ खेळाडूबाबत घडलंय असं

न्यूझीलंडच्या जेमिसनचा धोका टाळण्यासाठी माजी भारतीय फलंदाजाचा ‘विराटसेने’ला मजेशीर पण कामाचा सल्ला

मोठी बातमी! मुंबई कसोटीतून रहाणे, इशांत, जडेजा, विलियम्सन बाहेर; ‘हे’ आहे कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---