आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या मेगा लिलावात सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Haydrabad) मोठी रक्कम खर्च करून वेस्ट इंडीजच्या निकोलस पूरन (Nicholas Pooran) याला विकत घेतले. त्यानंतर पूरनने सतत दमदार खेळ दाखवला आहे. भारताविरुद्ध काही दिवसांपूर्वी खेळल्या गेलेल्या मालिकेतही त्याने अप्रतिम फलंदाजी केली होती. आता वेस्ट इंडीजमध्ये त्रिनिदादा टी२० लीगमध्ये (Trinidad T10 Blast 2022) पूरनने अजून एक तुफानी खेळी केली आहे.
त्रिनिदादा टी२० लीगच्या ८ व्या सामन्यात पूरनने अवघ्या ३७ चेंडूत १०१ धावा ठोकल्या. यामध्ये ६ चौकार आणि १० षटकारांचा समावेश आहे. या धावा त्याने २७३ च्या स्ट्राइक रेटने केल्या आहेत. त्याच्या या दमदार खेळीच्या जोरावर लीथरबॅक जायंट्स संघाने सामन्यात विजय मिळवला. या खेळीमध्ये पूरनने एकापेक्षा एक जबरदस्त फटके खेळले, जे पाहून प्रत्येकजण हैराण झाला. यामध्ये त्याने काही अप्रतिम रिवर्स स्वीप फटकेही मारले. त्याच्या धमाकेदार खेळीचा व्हिडिओ फॅन कोडने त्यांच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून शेअर केला आहे.
https://twitter.com/FanCode/status/1498533874787176448?t=GiSdO7dPD5kqwCagRo_Lww&s=19
सामन्याचा विचार केला, तर कायरन पोलार्डच्या नेतृत्वातील एलबिस स्कोर्चर संघाने प्रथम फलदाजी केली आणि मर्यादित १० षटकांमध्ये ३ विकेट्सच्या नुकसानावर १२८ धावा केल्या. यामध्ये वेबस्टरने २६ चेंडूत ५४ धावा केल्या. ऐवर्ट निकोल्सनने १६ चेंडूत ४२ धावा केल्या. या दोघांच्या खेळीच्या जोरावर १२८ धावा केल्या. प्रत्युत्तरात लीथरबॅक जायंट्सने १ विकेटच्या नुकसनावर आणि ९ चेंडू शिल्लक ठेऊन विजय मिळवला. सामन्यात निकोलस पूरनने पाहण्यासारखी खेळी केली.
दरम्यान, आयपीएल फ्रेंचायझी सनरायझर्स हैदराबादसाठी निकोलस पूरनचा हा अवतार खूपच आनंदाची बाब ठरली आहे. आयपीएल मेगा लिलावात सनरायझर्सने पूरनवर १० कोटी ७५ लाखाची बोली लावली आणि त्याला संघात सामील केले आहे. आयपीएलचा आगामी हंगाम जवळ आला असून, पूरनचा हा फॉर्म संघासाठी फायदेशीर ठरू शकते. आयपीएल २०२२ हंगामातील त्याच्या प्रदर्शनावर सर्वांचेच लक्ष लागून आहे.
महत्वाच्या बातम्या –
गुजरात टायटन्स लागले आयपीएलच्या तयारीला! सुरु केले पहिले सराव शिबिर
आयपीएलनंतर केवळ २ टी२० सामन्यांसाठी ‘या’ देशाचा दौरा करणार टीम इंडिया
श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात खेळणार का अश्विन? उपकर्णधाराने दिली महत्त्वाची माहिती






