बुधवारी (२८ एप्रिल ) झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबाद संघाकडून मनीष पांडेने सर्वाधिक ६१ धावांची खेळी केली होती. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने ७ गडी राखून विजय मिळवला होता. हा सामना झाल्यानंतर सनरायझर्स हैदराबाद संघाच्या प्रशिक्षकांनी मनीष पांडेबद्दल मोठा खुलासा केला आहे.
चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्धच्या सामन्यातून मनिष पांडेने हैदराबादच्या अंतिम ११ जणांच्या संघात पुनरागमन केले होते. त्यापूर्वी त्याला काही सामन्यांतून वगळण्यात आले होते. त्याबद्दल तो कठिण निर्णय असल्याचे हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने म्हटले होते.
तसेच आता संघाचे प्रशिक्षक ट्रेवर बेलिस म्हणाले आहेत की, “हो, हा नक्कीच निवडकर्त्यांचा निर्णय होता. असे निदर्शनात आले होते की, तो चेपॉकमध्ये फिरकी गोलंदाजी खेळण्यात त्याला संघर्ष करावा लागत आहे. परंतु त्याने दिल्लीमध्ये त्याच प्रकारच्या खेळपट्टीवर धावा केल्या आहेत. तसेच त्याने दाखवून दिले की, तो किती चांगला खेळाडू आहे. अशी आशा आहे की येथून पुढे खेळपट्टी जर समान असतील तर, आम्हाला ठाऊक आहे तो कुठल्या प्रकारचा खेळाडू आहे.”
तसेच चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध डेव्हिड वॉर्नरने देखील ५५ चेंडूत ५७ धावांची खेळी केली होती. ही वॉर्नरची धीम्या खेळींपैकी एक खेळी ठरली. वॉर्नरबद्दल बोलताना प्रशिक्षक म्हणाले की, “हा, मला असे वाटते की, तो गोलंदाजांविरुद्ध खेळताना संघर्ष करत होता. त्याने क्षेत्ररक्षकांकडे भरपूर शॉट खेळले होते. डेव्हिड सारख्या खेळाडूंसोबत सहसा असे होत नाही, परंतु असे झाले होते. याने संघाला थोडे नुकसान झाले. परंतु संघातील अन्य खेळाडूंनी चांगली कामगिरी केली होती. संघाने १७१ धावांपर्यंत मजल मारली होती. याशिवाय चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली.”
महत्त्वाच्या बातम्या –
राजस्थानची ‘रॉयल’ मदत! कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी केले कोट्यवधी रुपयांचे दान
आयपीएलनंतर जूनपासून भारतातील ‘या’ राज्यात रंगणार टी२० स्पर्धेचा थरार
कोलकाताचा अनुभव की दिल्लीचा दम, कोण ठरणार वरचढ? ‘अशी’ असेल दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन






