इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 40वा सामना दिल्ली कॅपिटल्स वि. सनरायझर्स हैदराबाद संघात शनिवारी (दि. 29 एप्रिल) पार पडणार आहे. अरुण जेटली स्टेडिअममध्ये पार पडणाऱ्या या सामन्याला सायंकाळी 7.30 वाजता सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी उभय संघात नाणेफेक झाली. ही नाणेफेक सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार एडेन मार्करम याने जिंकली आहे. तसेच, त्याने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात मार्करम संघाला विजयी करून चांगल्या स्थितीत आणण्याचा प्रयत्न करेल.
या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघात काही बदल आहेत. अकील होसेन हा हैदराबादकडून आयपीएल पदार्पण करत आहे, तर अब्दुल समद याचे संघात पुनरागमन झाले आहे. तसेच, दिल्ली संघातही काही बदल आहेत. दिल्ली संघात युवा फलंदाज प्रियम गर्ग पदार्पण करत आहे. तसेच, अमन खान हा संघातून बाहेर पडला आहे. (Sunrisers Hyderabad have won the toss and have opted to bat against Delhi Capitals)
https://twitter.com/IPL/status/1652305303025876992
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
सनरायझर्स हैदराबाद
हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडेन मार्करम (कर्णधार), हेन्रीच क्लासेन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, अब्दुल समद, अकील होसेन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, उमरान मलिक
दिल्ली कॅपिटल्स
डेविड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), मिचेल मार्श, मनीष पांडे, प्रियम गर्ग, अक्षर पटेल, रिपल पटेल, कुलदीप यादव, एनरिक नॉर्किया, ईशांत शर्मा, मुकेश कुमार
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लय वाईट! ‘या’ 3 धुरंधरांना IPL 2023मध्ये मिळेना संधी, फलंदाजीने मैदानात आणू शकतात वादळ
फ्लॉवर नहीं, फायर हैं! गुरबाजने पंड्याला ठोकले खणखणीत षटकार, स्वप्नातही विसरणार नाही कॅप्टन, Video






