राजस्थान रॉयल्स संघाविरुद्धच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाला ६१ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. हा सामना मंगळवारी (२९ मार्च) पुण्याच्या एमसीए स्टेडिअमवर पार पडला. आयपीएल २०२२च्या पाचव्या सामन्यात हैदराबादला पराभव तर मिळालाच, पण त्यासोबतच त्यांच्या नावावर एका लाजिरवाण्या विक्रमाचीही नोंद झाली. कोणता आहे तो लाजिरवाणा विक्रम?, चला जाणून घेऊया…
झाले असे की, नाणेफेक जिंकून हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि राजस्थान (Rajasthan Royals) संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यावेळी राजस्थानने ६ विकेट्स गमावत निर्धारित २० षटकात २१० धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करतान हैदराबाद संघाला निर्धारित २० षटकात ७ विकेट्स गमावत फक्त १४९ धावाच करता आल्या. विशेष म्हणजे, या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबाद संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती.
हैदराबाद संघाने पावरप्लेमध्येच आपले ३ विकेट्स गमावत फक्त १४ धावा केल्या. यामुळे त्यांच्या नावावर आयपीएल इतिहासात पावरप्लेमध्ये सर्वात कमी धावांवर बाद होण्याचा नकोसा विक्रम नोंदवला गेला. हैदराबाद संघाने याबाबतीत २००९ सालच्या आयपीएलमध्ये राजस्थान संघाची बरोबरी केली आहे. आयपीएल २००९मध्ये केप टाऊन येथे खेळण्यात आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्धच्या सामन्यात राजस्थान संघाला पावरप्लेमध्ये २ विकेट्स गमावत १४ धावाच करता आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या स्थानी चेन्नई सुपर किंग्स संघ आहे. चेन्नईने २०११ साली कोलकाता येथे खेळण्यात आलेल्या कोलताका नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात पावरप्लेमध्ये २ विकेट्स गमावत फक्त १५ धावा करता आल्या होत्या.
यानंतर संयुक्तरीत्या तिसऱ्या क्रमांकावर चेन्नई संघच आहे. चेन्नईने आयपीएल २०१५मध्ये रायपूर येथे दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळताना पावरप्लेमध्ये १ विकेट गमावत फक्त १६ धावा केल्या होत्या. त्यानंतर चेन्नईने २०१९मध्ये चेन्नई येथे खेळताना रॉयल चॅलेंजर्स संघाविरुद्धही पावरप्लेमध्ये १ विकेट गमावत १६ धावाच केल्या होत्या.
आयपीएलमध्ये पावरप्लेमध्ये खेळताना सर्वात कमी धावसंख्या करणारे संघ
१४/३- सनरायझर्स हैदराबाद (विरुद्ध राजस्थान रॉयल्स, पुणे- २०२२)
१४/२- राजस्थान रॉयल्स (विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, केप टाऊन- २००९
१५/२- चेन्नई सुपर किंग्स (कोलकाता नाईट रायडर्स, कोलकाता- २०११)
१६/१- चेन्नई सुपर किंग्स (दिल्ली कॅपिटल्स, रायपूर- २०१५)
१६/१- चेन्नई सुपर किंग्स (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, चेन्नई- २०१९)
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
हाव इज द ‘जोस’! छोटेखानी ३५ धावांच्या खेळीसह बटलरच्या शिरपेचात नवा विक्रम; सचिन, मार्शच्या यादीत उडी
भारत विश्वचषकातून बाहेर, पण आयसीसीच्या वनडे क्रमवारीत खेळाडूंची मोठी झेप; कर्णधार मितालीही फायद्यात