---Advertisement---

IPL 2026: तीन सामने अन् तीन वाद, काव्या मारनचा सनरायझर्स हैद्राबाद बीसीसीआयकडे करणार तक्रार

On: मंगळवार, एप्रिल 7, 2026 11:02 AM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या हंगामाची सुरूवात काही संघांसाठी चांगली झाली, तर काही संघ अजूनही पहिल्या विजयाच्या शोधात आहेत. यामधील एक संघ असा ज्याचे तीन सामने खेळून झाले, मात्र त्या तिन्ही सामन्यांमध्ये काहीना काही घटना घडल्या. ज्यामुळे त्यांचे व्यवस्थापन चांगलेच नाराज झाले असून ते आता तक्रार दाखल करण्याच्या तयारीत आहेत.

काव्या मारनची फ्रॅंचायजी सनरायझर्स हैद्राबादने (एसआरएच) आतापर्यंत तीन सामने खेळले असून संघाने त्यातील दोन सामने गमावले आणि एक जिंकला. काही रिपोर्ट्सनुसार, या हंगामातील त्यांच्या पहिला आणि दुसऱ्या सामन्यात दिलेल्या वादग्रस्त झेलबद्दल आणि तिसऱ्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सच्या खेळाडूने केलेल्या हस्तक्षेपाबद्दल ते बीसीसीआयकडे (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) तक्रार करण्याची शक्यता आहे.

पहिल्या सामन्यात एसआरएचचा गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून (आरसीबी) पराभव झाला. या सामन्यात त्यांचा फलंदाज हेनरिक क्लासेनचा झेल आरसीबीचा क्षेत्ररक्षक फिल सॉल्टने सीमारेषेवर पकडला. तेव्हा तो निर्णय तिसऱ्या पंचांकडे गेला असता त्यांनी क्लासेनला बाद दिले आणि त्या विकेटचा रिप्ले पाहिला असता सॉल्टचा पाय कुशनला लागल्याचे दिसते.

एसआरएचचा दुसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) विरुद्ध होता. या सामन्यात त्यांचा सलामीवीर अभिषेक शर्माच्या झेलमुळेही वाद निर्माण झाला. केकेआरचा क्षेत्ररक्षक वरुण चक्रवर्तीने सीमीरेषेजवळ त्याचा झेल घेतला, त्यामध्ये चेंडूचा काही भाग जमिनीला स्पर्श करत असल्याचे दिसते. पंचांनी अभिषेकला बाद दिले आणि त्यामुळे त्याने नाराजी व्यक्त केली होती. हा सामना एसआरएचने जिंकला, मात्र त्या झेलमुळे वाद निर्माण झाला होता.

एसआरएच विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स (एलएसजी) सामन्यातही एक घटना घडली, त्याकडे फारसे लक्ष गेले नाही. झाले असे की, एलएसजीचा कर्णधार रिषभ पंतने २० व्या षटकातील पाचवा चेंडू सीमारेषेच्या दिशेने मारला, तो चेंडू सीमरेषा ओलांडण्याआधीच तेथे उभा असलेला लखनऊचा खेळाडू आवेश खानने विजयाच्या उत्साहात त्याच्यावर शॉट मारला.

आवेशच्या या प्रकाराची नंतर सोशल मीडियावर फार चर्चा झाली. हे आयपीएलच्या नियमाविरुद्ध आहे. त्यामुळे एसआरएचला ५ पेनाल्टी धावा मिळायला पाहिजे होत्या, मात्र त्यावेळी त्याच्या आसपास कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता. यामुळे त्याने नियम मोडले असे म्हटले जाऊ शकत नाही.

हैद्राबादच्या पुढील सामना ११ एप्रिलला पंजाब किंग्जविरुद्ध आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---