दुबई। १४ व्या एशिया कप स्पर्धेत आज(२३ सप्टेंबर) भारत विरुद्ध पाकिस्तान संघात सुपर फोर फेरीतील दुसरा सामना होणार आहे. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यासाठी भारताच्या ११ जणांच्या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सुपर फोरमध्ये बांगलादेश विरुद्ध खेळलेलाच संघ कायम ठेवण्यात आला आहे.
तर पाकिस्तान संघात मोहम्मद अमीरचे पुनरागमन झाले आहे. त्याला उस्मान शिनवारीच्या ऐवजी संघात घेतले आहे. तसेच शादाब खानला हरीस सोहेलच्या ऐवजी ११ जणांच्या पाकिस्तान संघात संधी देण्यात आली आहे.
या सामन्याआधी सुपर फोरमध्ये भारताने बांगलादेशचा ८ विकेट्सने सहज पराभव केला आहे तर पाकिस्तानला मात्र आफगाणिस्थान विरुद्ध विजयासाठी संघर्ष करावा लागला होता. अखेर त्यांनी रोमहर्षक झालेल्या या सामन्यात ३ विकेट्सने विजय मिळवला होता.
तसेच या स्पर्धेत साखळी फेरीत भारत आणि पाकिस्तान हे आमने सामने आले होते. या सामन्यात भारताने ८ विकेट्सने सहज विजय मिळवला होता.
याबरोबरच हे दोन संघ एशिया कपमध्ये आत्तापर्यंत वनडेत १२ वेळा आमने सामने आले आहेत. यात भारताने ६ आणि पाकिस्तानने ५ सामने जिंकले आहेत. तसेच १ सामना अनिर्णित राहिला आहे
तसेच २०१६ ला टी20 प्रकारात खेळलेल्या एशिया कपमध्ये या दोन संघांमध्ये झालेल्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता.
असे आहेत ११ जणांचे संघ-
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन(उपकर्णधार), अंबाती रायडू, केदार जाधव, एमएस धोनी (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह.
पाकिस्तान:सर्फराज अहमद (कर्णधार), फकार जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम, शोएब मलिक, शदाब खान, मोहम्मद नवाज, फहीम अशरफ, शाहीन अफ्रिदी, आसिफ अली , मोहम्मद अमीर.
महत्वाच्या बातम्या-
–पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यरने रेल्वेला धु-धु धुतले, मुंबईचा ४०० धावांचा डोंगर
–रोहित शर्मा आणि शिखर धवन ही जगातील सर्वात विध्वंसक जोडी
-एशिया कप २०१८: टीम इंडियासमोर अनपेक्षित पाकिस्तानचे कडवे आव्हान