---Advertisement---

पुन्हा एकदा सुपर ओव्हर! चौथा टी20 सामना बरोबरीत

---Advertisement---

वेलिंग्टन। न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात आज(31 जानेवारी) स्काय स्टेडियम येथे चौथा टी20 सामना सुरु आहे. या सामन्यात निर्धारित 20-20 षटकानंतर बरोबरी झाली आहे. त्यामुळे या टी20 मालिकेत सलग दुसऱ्यांदा सुपर ओव्हरचा थरार रंगणार आहे.

आजच्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना  प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 165 धावा केल्या आणि न्यूझीलंडला विजयासाठी 166 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडलाही निर्धारित 20 षटकात 7 बाद 165 धावा केल्या. त्यामुळे या सामन्यात बरोबरी झाली आहे.

या टी20 मालिकेत तिसऱ्या सामन्यातही बरोबरी झाल्याने सुपर ओव्हर झाली होती. या सुपर ओव्हरमध्ये भारताने विजय मिळवला होता.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---