भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी याला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस मिळाली आहे. मागील काही वर्षापासून सुरू असलेल्या आम्रपाली समूह प्रकरणात ही नोटीस देण्यात आली आहे. एवढेच नाही तर सर्वोच्च न्यायालयाने आम्रपाली समूह प्रकरणात सुरू केलेल्या मध्यस्थी प्रक्रियेलाही स्थगिती दिली आहे. धोनीच्या अर्जावर दिल्ली उच्च न्यायालयाने मध्यस्थीचा आदेश दिला होता.
काय आहे प्रकरण?
जवळपास पाच वर्ष धोनी आम्रपाली समूहाचा ब्रँड अँबेसिडर होता. २०१६ तो करार पूर्ण झाल्यानंतर आम्रपाली समूहाने आपली ४० कोटी रुपयांची फी दिली नाही, अशी तक्रार करत धोनीने दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज केला होता. त्याने या प्रकरणी उच्च न्यायालयात खंडपीठाची मागणी केली होती. आता याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने धोनीला नोटीस दिली आहे. धोनीच्या त्या अर्जानंतर आम्रपाली समूह सुप्रीम कोर्टात गेला होता. याच प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने धोनीला नोटीस बजावली आहे. त्याचबरोबर खंडपीठाच्या कारवाईलाही स्थगिती देण्यात आली आहे.
सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान आम्रपाली समूहाकडून सांगण्यात आले आहे की, पैशाच्या कमतरतेमुळे लोकांना त्यांची घरे सध्या मिळू शकत नाहीत. तर दुसरीकडे धोनीने १५० कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली होती. या प्रकरणी मध्यस्थी समितीने धोनीच्या बाजूने आदेश दिल्यास आम्रपाली समूहाला १५० कोटी रुपये द्यावे लागतील. ज्यामुळे गुंतवणूकदार व फ्लॅट धारकांना फ्लॅट मिळणे कठीण होईल.
भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे धोनी
धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार मानला जातो. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने दोन विश्वचषक तसेच चॅम्पियन ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले होते. २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी, अद्याप तो आयपीएलमध्ये खेळताना दिसतो. पुढील वर्षी कदाचित तो अखेरच्या वेळी आयपीएल खेळताना दिसू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
सिनियर्सच्या अनुपस्थितीत यंगस्टर्सनी दाखवला दम; रोहित-विराटला आता…
INDvsWI। विंडीजला हरवत ‘गब्बर’ने केली ‘कॅप्टन कुल अन् दादा’ची बरोबरी