भारताचा युवा कुस्तीपटू सूरज वशिष्ठने रोम येथे सुरू असलेल्या अंडर-१७ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचला आहे. त्याने कुस्तीच्या ५५ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. सुरजने अंतिम सामन्यात अझरबैजानच्या युरोपियन विजेत्या फारिम मुस्तफायेवचा ११-० असा पराभव केला. महत्त्वाची बाब म्हणजे या चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा सूरज हा केवळ तिसरा भारतीय ग्रीको-रोमन कुस्तीपटू ठरला आहे. यापूर्वी पप्पू यादव यांनी ३२ वर्षांपूर्वी देशासाठी सुवर्णपदक जिंकले होते. या स्पर्धेतील हे भारताचे तिसरे सुवर्ण ठरले. पप्पू यांच्या आधी विनोद कुमार यांनी १९८० मध्ये भारतासाठी पहिल्यांदा सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी केली होती.
Another Historic Feat after 32 years 🤩🤩
Suraj wins Gold in Greco-Roman (GR) 🤼♂️ 55kg event at the 2022 World Cadet Championships #WrestleRome; becoming 🇮🇳's 1st GR U-17 World Champion in 32 yrs 🔥🔥
Pappu Yadav was the last U17 World Champion in 1990
📸 @wrestling#Wrestling pic.twitter.com/0esZYPzz9u
— SAI Media (@Media_SAI) July 26, 2022
सुरजने सामन्यात वेगवान सुरुवात करत, प्रतिस्पर्धी कुस्तीपटूला सावध पवित्रा घेण्यास भाग पाडले. ज्यामुळे त्याला सुरुवातीलाच गुण मिळाले. टेकडाऊनचे दोन आणि त्यानंतर पुन्हा दोन गुण घेत त्याने आपली आघाडी वाढवली. दुसऱ्या हाफमध्ये देखील त्याचे आक्रमण कमी झाले नाही व तो सातत्याने गुण घेत राहिला. त्याचमुळे अखेरीस ११-० अशी आघाडी मिळाली असताना त्याला विजयी घोषित करण्यात आले.
सुरजने या विजयानंतर प्रतिक्रिया देताना म्हटले, “माझे स्वप्न आहे की मला माझ्या वजनी गटात जगात सर्वोत्तम बनायचे आहे. आता माझे पुढचे लक्ष वरिष्ठ गटात पदक मिळवण्याचे असेल.” सुरज हा हरियाणातील रोहतक जिल्ह्यातील रिथल या गावचा नागरिक आहे. तसेच सध्या तो भारतीय संघाचे प्रशिक्षक इंद्रजीत सिंग यांच्याकडे सराव करतो. इंद्रजीत यांनादेखील त्याच्याकडून भविष्यात आणखी मोठ्या कामगिरीची अपेक्षा आहे. या यशानंतर टोकियो ऑलिंपिकमध्ये कुस्तीतच कांस्यपदक मिळवणारा भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनिया याने ट्विट करत सुरजचे अभिनंदन केले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
कर्णधार ‘गब्बर’ ठरतोय माहीपेक्षाही वरचढं?, केलीये ‘या मोठ्या विक्रमाची बरोबरी