शुक्रवार (२ ऑक्टोबर) रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात आयपीएल २०२०चा १४वा सामना पार पडला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई येथे खेळण्यात आलेला हा सामना दोन्ही संघांचा या हंगामातील चौथा सामना होता. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
हैदराबादविरुद्धचा सामना हा धोनीच्या आयपीएल कारकिर्दीतील १९४वा सामना होता. यासह धोनी हा आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू ठरला आहे. चेन्नईचा स्टार फलंदाज सुरेश रैनानेसुद्धा आयपीएलमध्ये १९३ सामने खेळले आहेत. परंतु रैना आयपीएल २०२०चा भाग नाही, त्यामुळे आजचा सामना खेळून धोनीने सर्वाधिक सामने खेळण्याच्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
यानंतर रैनाने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत. धोनीचा चेन्नई संघाची जर्सी घातलेला फोटो शेअर करत रैनाने लिहिले की, “आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा अव्वल क्रमांकाचा खेळाडू ठरल्यामुळे अभिनंदन माही भाई. तू माझ्या नावावर असलेला मोठा विक्रम मोडलास याचा मला खूप आनंद आहे. आजच्या सामन्यासाठी तुला शुभेच्छा. मला विश्वास आहे की, चेन्नई संघ यावर्षी आयपीएल ट्रॉफी पटकावेल.”
https://twitter.com/ImRaina/status/1312024045987258369?s=20
रैनापाठोपाठ आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याच्या यादीत मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (१९२ सामने) तिसऱ्या क्रमांकावर आहे. या विक्रमात रैनाची बरोबरी करण्यासाठी त्याला फक्त १ सामना खेळण्याची गरज आहे. तर कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार दिनेश कार्तिक १८५ सामन्यांसह चौथ्या क्रमांकावर विराजमान आहे.
२००८ साली आयपीएलमध्ये पदार्पण केलेल्या धोनीने १९४ सामने खेळत ४४७६ धावा केल्या आहेत. यात त्याच्या २३ अर्धशतकांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलने शिकवलं आता गाजवतायत जग; ‘या’ दोघांच्या शतकी भागिदारीचे सर्वत्र होतंय कौतुक
‘हा’ माजी क्रिकेटर आता देणार वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघाला प्रशिक्षणाचे धडे
ट्रेंडिंग लेख-
गळ्यात २५ तोळ्याची सोन्याची चैन घालून गोलंदाजी करणारा भारताचा प्रविण कुमार
इरफान पठानच्या तालमीत तयार झालेला अब्दुल समद
‘बिग टॉम’ बिरुदावली लाभलेले टॉम मूडी म्हणजे ‘दर्जेदार खेळाडू आणि असामान्य प्रशिक्षक’






