आयपीएलचा 12 वा मोसम येत्या शनिवारपासून सुरु होत आहे. या मोसमातील पहिलाच सामना 23 मार्चला गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात होणार आहे. या सामन्यासाठी केवळ आता 5 दिवसच राहिल्याने खेळाडूंनी सरावाला सुरुवात केली आहे.
सर्वच संघ वेगवेगळ्या पद्धतीने सराव करत आहेत. यामध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाने एमए चिदम्बरम स्टेडियमवर (चेपॉक स्टेडियम) सोमवारी सराव सामना खेळला आहे. या सराव सामन्यात सुरेश रैनाने तुफानी अर्धशतक करत यावर्षीही आयपीएलमध्ये दमदार खेळ करण्यास सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत.
त्याने या सामन्यात 29 चेंडूत 56 धावा केल्या. या खेळीत त्याने 1 चौकार आणि 6 षटकारही मारले आहेत. रैना हा आत्तापर्यंत आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळलेला आणि सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्यामुळे यावर्षीही आता त्याची कामगिरी कशी होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सोमवारी झालेल्या चेन्नई सुपर किंग्जच्या सराव सामन्यात रैनाबरोबरच अंबाती रायडूने 23 चेंडूत 40 धावा केल्या. तर ध्रुव शोरेने 26 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकारांसह 43 धावा केल्या.
यामुळे चेन्नईच्या फलंदाजांनी 20 षटकात 199 धावा केल्या. तर गोलंदाजीत शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या, मात्र त्याने 4 षटकात 45 धावा दिल्या. तसेच अन्य गोलंदापैकी हरभजन सिंग (1/23), दीपक चहर (1/27) आणि कर्ण शर्मा(40/1) यांनी विकेट घेतल्या आहेत.
या सामन्याचा धावफलक चेन्नई सुपर किंग्जने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
The #SuperPractice that was! A single innings affair where the Batting Lions took on the Bowling Lions amidst a turnout of over 12,000 at the #AnbuDen! And the Lions won by a margin of #Yellove to the power of infinity! #WhistlePodu 🦁💛 pic.twitter.com/wi3rQVBlgQ
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 18, 2019
चेन्नईने आत्तापर्यंत आयपीएलचे 2010, 2011 आणि 2018 असे तीनवेळा विजेतेपद जिंकले आहे. तसेच ते गतविजेते असल्याने यावर्षी विजेतेपद आपल्याकडेच कायम राखण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.
The Super #ChinnaThala innings from the Practice Match filled with #Yellove in the background! #WhistlePodu #Anbuden 💛🦁 pic.twitter.com/GELCBiNE9H
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 18, 2019
महत्त्वाच्या बातम्या-
–आयपीएलचे तब्बल ११ हंगाम एकाच संघाकडून खेळलेला तो एकमेव खेळाडू
–आज, तेही भारतात, टीम अफगाणिस्तानने घडवला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतिहास
–डेव्हिड वाॅर्नरची धमाकेदार सुरुवात, क्रिकेटमध्ये केली जबरदस्त वापसी