मुंबई। आयपीएलचा 11 वा मोसम आता अखेरच्या टप्यात आली आहे. मंगळवारी, 22 मेला आयपीएल प्ले-आॅफला सुरवात झाली.
प्ले-आॅफमधील क्वालिफायर 1 चा सामना सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्याच रंगला. या सामन्यात चेन्नईचा धडाकेबाज फलंदाज सुरेश रैनाला आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानी पुन्हा येण्याचा पराक्रम केला.
त्याने १७५ सामन्यात ३४.३९ च्या सरासरीने ४९५३ धावा केल्या आहेत. त्याला १६३ सामन्यात ४९४८ धावा करणाऱ्या विराट कोहलीच्या पुढे जायला केवळ १८ धावांची गरज होती. काल २२ धावा करत त्याने कोहलीला मागे टाकले.
आता हा विक्रम त्याच्या नावावर वर्षभर रहाणार आहे. कारण त्याला ज्या खेळाडूची या विक्रमासाठी स्पर्धा होती त्या विराटची टीम आयपीएलमधून बाहेर गेली आहे.
काही दिवसांपुर्वीच रैनाचा संघसहकारी आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने ४००० धावांचा टप्पा पार केला. यामुळे हा टप्पा पार करणारा तो केवळ सहावा भारतीय तर एकूण सातवा खेळाडू ठरला आहे.
याआधी आयपीएलमध्ये 4000 धावा विराट कोहली, सुरेश रैना, रोहित शर्मा, गौतम गंभीर, राॅबीन उथप्पा आणि डेविड वार्नर या खेळाडूंनी केला आहे. यामध्ये वार्नर एकमेव परदेशी खेळाडू आहे.
शेवटच्या सामन्यात जर त्याने ४७ धावा केल्या तर आयपीएलमध्ये ५००० धावा करणारा तो पहिला खेळाडू ठरणार आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू:
सुरेश रैना: 4953 धावा (सामने- 175)
विराट कोहली: 4948 धावा (सामने- 163)
रोहित शर्मा: 4493 धावा (सामने- 173)
गौतम गंभीर: 4217 धावा (सामने- 154)
राॅबीन उथप्पा: 4081 धावा (सामने- 163)
एमएस धोनी: 4016 धावा (सामने- 174)
डेविड वार्नर: 4014 धावा (सामने- 114)
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
४९५३- सुरेश रैना
४९४८- विराट कोहली
४४९३-रोहित शर्मा
४२१७- गौतम गंभीर
४०८१-राॅबीन उथप्पा
४०१६- एमएस धोनी
४०१४- डेविड वार्नर#म #मराठी @MarathiBrain @MarathiRT @Mazi_Marathi @Maha_Sports @BeyondMarathi @kridajagat— Sharad Bodage (@SharadBodage) May 23, 2018